विकासकामांची पायाभरणी ; ही जनतेच्या ऋणातून उतराई – आ. आशुतोष काळे
Laying the foundation for development work; It came down from the debt of the people – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16Feb 2021, 12:00
कोपरगाव : विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले विकासाच्या आश्वासन पूर्तीसाठी अथक प्रयत्नांनी मिळालेल्या कोट्यावधीच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी ही जनतेच्या ऋणातून उतराई असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव व टाकळी येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत १.३५ कोटी निधीतील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व आदी कामांचे भूमिपूजनप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.
आशुतोष काळे म्हणाले की, धारणगावमधील सतरा किलोमीटरचे एकूण आठ रस्ते नकाशावर घेवून या रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केले असून टप्याटप्प्याने मतदार संघातील सर्वच रस्त्यांचा अनुशेष भरून काढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल धारणगाव व टाकळी ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला . यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कारभारी आगवन, पद्माकांत कुदळे, हरिभाऊ शिंदे, श्रावण आसने, सरपंच नानासाहेब चौधरी, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





