डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची, रुग्णसेवा पुन्हा सुरू करा.- स्नेहलता कोल्हे

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची, रुग्णसेवा पुन्हा सुरू करा.- स्नेहलता कोल्हे

मंत्री  राजेश टोपे यांच्याकडे मागणी

Dedicated Covid Health Center, resume patient care. – Snehalta Kolhe

Demand to Minister Rajesh Tope

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16Feb 2021, 18:00

कोपरगाव : तालुका ग्रामीण रुग्णालयांमध्ये सरकारतर्फे सुरु केलेले मोफत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची (DCHC) रुग्णसेवा कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र भासवत शासनाने २६ जानेवारी पासून बंद केली आहे ती रुग्णसेवा पुन्हा सुरू करावी. अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

पत्रकातून सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोरोना रुग्णसंख्या घटल्याने, सरकारने सर्व ‘डीसीएचसी’ बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. यापुढे गरजू कोरोना रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र वस्तुस्थिती पाहता आकडेवारी कमी झालेली असली तरी कोरोना चे संकट अद्यापही कमी झालेले नाही, प्रत्येक तालुक्यात शासनातर्फे कोरोना रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, सात दिवस विलिनीकरण, मोफत औषधोपचार, शरीराचे तापमान ऑक्सिजनची पातळी व रक्ताच्या तपासण्या, छातीचे एक्स-रे, गरजूंना ऑक्सिजन सुविधा, चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था ही खासगी रुग्णालयांमधून लाखो रुपये खर्च करून, मिळणारी वैद्यकीय सेवा शासनाच्या हेल्थ सेंटरमध्ये मोफत उपलब्ध झाल्याने अनेक नागरिकांचे प्राण वाचले होते. त्यामुळे मागील सात- आठ महिने गोरगरीब रुग्णांसाठी शासनाचे कोविड हेल्थ सेंटर देवदूत ठरले होते असेही सौ कोल्हे म्हणाल्या.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली. जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद केले. तर नवीन वर्षात २६ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आल्याने नागरिकांना खासगी ठिकाणी भरमसाठ पैसे माजावे लागत आहे. पैशाअभावी काहीजण उपचार घेणे टाळत आहे. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागण्याची भीती आहे. ही नागरीकांची गैरसोय व समस्या सोडविण्यासाठी बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर सुरु करणे तातडीने गरजेचे असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या, .

Leave a Reply

You cannot copy content of this page