कोपरगावमध्ये दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीनी पळवले, तक्रारी दाखल   

कोपरगावमध्ये दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीनी पळवले, तक्रारी दाखल

In Kopargaon, two minor girls were abducted by an unknown person, a complaint was lodged

लग्नासाठी बळजबरीने पळून नेले एका आरोपीस अटक Accused arrested for fleeing for marriage

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16Feb 2021, 20:00

कोपरगाव : शहरातील  दोन अल्पवयीन मुलीना वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची घटना  घडली आहे.  यातील  एक मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते आहे. तर दुसरी मुलगी घरकाम करणारी आहे.  प्रकरणी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लग्नासाठी बळजबरीने पळून नेले होते एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

एक मुलगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ   तर दुसरी डॉ. नेने हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या  दोन्ही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची घटना  घडली आहे.  या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका मुलीचे वय १२ असून ती इयत्ता सातवीत  शिकते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळून सोमवारी (१५) रोजी रात्री १९.४५ वा.चे सुमारास ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी आलीच नाही. म्हणून तिच्या पालकांनी तिची सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. मुलीच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. हा याबाबत तपासी अधिकारी पोहेकॉ. १७७७ डी. आर.. तिकोणे, यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन अवघ्या  दोनच दिवसात येवला तालुक्यातील तळवडे येथे आरोपीला अटक केली  आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपहरण  झालेल्या मुलीचे कुटुंब कोरोना काळात येवला येथील आपल्या शेतीवर राहत होते, दोनच दिवसांपूर्वी शनिवारी ते कोपरगाव येथे पुन्हा आले होते. आरोपी राजू पोपट पगारे (३५) रा. तळवडे ता.  येवला, या  लग्न झालेल्या तरुणाने   या बारा वर्षाच्या मुलीला बळजबरीने लग्न करण्यासाठी पळवून नेले होते.  आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दुसरी मुलगी  वय १६ असून ती लहानसहान कामे करते, सोमवारी (१५) रोजी रात्री १७.१७
वा.चे सुमारास पुष्पांजली शॉपी, अमृतकर बिल्डींग कोपरगांव येथे कामास गेली होती.  त्यानंतर ती घरी आलीच नाही. म्हणून तिच्या पालकांनी तिची सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. मुलीच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची कोपरगाव शहर  पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या दोन्ही अपहरण  प्रकरणी   शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. एस. सी. पवार हे करीत आहे.

अपहरण  झालेल्या मुलीचे कुटुंब कोरोना काळात येवला येथील आपल्या शेतीवर राहत होते, दोनच दिवसांपूर्वी शनिवारी ते कोपरगाव येथे पुन्हा आले होते. आरोपी राजू पोपट पगारे (३५) रा. तळवडे ता.  येवला, या  लग्न झालेल्या तरुणाने   या बारा वर्षाच्या मुलीला बळजबरीने लग्न करण्यासाठी पळवून नेले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page