संवत्सर सर्जेराव वाळुंज यांचे निधन
कोपरगाव
तालुक्यातील संवत्सर येथील सर्जेराव रेवबा वाळुंज (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे. सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे कर्मचारी अशोक वाळुंज यांचे ते वडील होते, तर कै. सर्जेराव वाळुंज यांनी संजीवनी कारखान्यात बुलडोजर चालक म्हणून काम केले, त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.





