गोदावरी कालव्याला २० तारखेला आवर्तन -आ. आशुतोष काळे

गोदावरी कालव्याला २० तारखेला आवर्तन -आ. आशुतोष काळे

Rotation of Godavari canal on 20th. MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17Feb 2021, 18:00

 कोपरगाव :गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला तातडीने आवर्तन सोडावे याबाबत मागील पंधरा दिवसांपासून आमदार आशुतोष काळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी करीत होते. त्या मागणीची दखल घेऊन शनिवार (दि.२०) पासून पाटबंधारे विभाग गोदावरी उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तनाची आस लागली होती. कायम अडचणीत असलेला शेतकरी आलेल्या संकटाला तोंड देवून पुढे चालत असतो. यावर्षी शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेतात रब्बी हंगामाची पिके उभी केली. बहुतांशी पिके शेवटच्या पाण्यावर असून या पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध होऊन  पिकांना पाण्याची टंचाई झळ बसू नये व शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्या मागणीप्रमाणे पाटबंधारे विभागाने येत्या २० तारखेला उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे. गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून  वेळेवर आवर्तन सोडण्यात येणार असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page