मी माजी आमदारांच्या तालावर नाचलो नाही म्हणूनच कोल्हे गट चवताळलेला – विजय वहाडणे 

मी माजी आमदारांच्या तालावर नाचलो नाही म्हणूनच कोल्हे गट चवताळलेला – विजय वहाडणे

I didn’t dance to the beat of the former MLAs, that’s why the  Kohle group chewed – to Vijay wahadne

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18Feb 2021, 19:00

 कोपरगाव : तुम्हीच सांगता कि प्रशासन व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके आहेत, पण आमदारपद असतांना हे भान का नव्हते? आताचे आमदार आशुतोष काळे यांना भान असल्यानेच त्यांच्यात व माझ्यात विकासासाठी समन्वय आहे, मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांचीही मला साथ आहे, त्यामुळे तुमचे पोट का दुखते? असा सवाल करताना मी माजी आमदारांच्या तालावर नाचलो नाही म्हणूनच कोल्हे गट चवताळलेला असल्याची घणाघाती टिका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बोलताना वहाडणे म्हणाले, मी नगराध्यक्ष झाल्यापासून (तुम्ही निधी मिळू दिलेला नसूनही) जवळपास ४ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत, जास्त विकासकामे तर कोल्हे गटाच्या प्रभागात झालेली आहेत. पण आता प्रमुख रस्त्यांची कामे झाली तर वहाडणे यांना श्रेय मिळेल म्हणूनच तुम्ही अडथळे आणत जात असले तरी उत्तर द्यायला मी समर्थ आहे. ४२ कोटीच्या पाणी योजनेतीलच पाणी तुम्ही पित आहात. निसर्ग कन्सल्टन्सीला हाकलल्याने नगरपरिषदेला दिड कोटीचा भुर्दंड पडणार आहे. आम्हीच ती कामे पूर्ण करत आहोत,तुम्ही तर टक्केवारी घेऊन मोकळे झाले. याला जबाबदार कोण? अनेक पराक्रम मी जाहीर करणारच आहे. सल्ला देणाऱ्यांनी बंद पाईपलाईनने पाणी आणण्याचा DPR कुणाच्या दमबाजीमुळे बाजूला ठेवला? श्री.पराग संधान यांनी सांगावे, प्रत्यक्ष कामाचे मोजमाप होऊनच बिल दिले जाते. अंदाजपत्रक म्हणजे पेमेंट नव्हे. तुम्ही आमदार असतांना भाजपाची राज्यात सत्ता असूनही विस्थापितांसाठी तुम्ही का दिवे लावले नाहीत. संगमनेर व सिन्नरसारखे गाळे बस स्टॅण्डभोवती करता आले असते कि नाही? सातभाई म्हणतात कि, ४७० खोका शॉप होऊ शकतील अशी योजना तयार होती तर तुम्ही सत्तेत असतांना झोपले होते का? कोल्हे यांना खुश करण्यासाठी किती खोटे बोलणार? शहरात अतिक्रमणे वाढत आहेत. तुम्हाला शहराची काळजी असेल तर आधी स्वतःची अतिक्रमणे काढा. मी अतिक्रमणे काढावी म्हणजे तुम्हाला माझ्याविरुद्ध बोंब मारता यावी हाच तुमचा दुष्ट हेतू आहे. तीन दिवसांनंतर मी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन क्रीडांगणाचे आरक्षण, भ्रष्टाचार, ठेकेदार- नगरसेवक संबंध तसेच काही महान नगरसेवकांचे पराक्रम नावासह जनतेसमोर मांडणार आहे. सरळ असा इशारा वहाडणे आणि शेवटी पत्रकार परिषदेतून दिला.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page