डिझलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; चार जण अटकेत, तीन दिवसाची पोलिस कोठडी
Diesel theft racket scandal; Four arrested, three days in police custody
दोन लाख छत्तीस हजाराचा माल जप्त Two lakh and thirty six thousand goods confiscated
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18Feb 2021, 19:30
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्ती येथील समृध्दी महामार्गाचे कॅम्पवरील वाहनातून डिझेलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा कोपरगाव शहर पोलीस पथकाने गुरूवारी (ता.१८) रोजी भांडाफोड केला. चार जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्ती येथील समृध्दी महामार्गाचे कॅम्पवरील वाहनातून मंगळवारी १६ रोजी पहाटे चार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने १,१३२०० रु (एक लाख तेरा हजार दोनशे रुपये) किंमतीचे ११४० लिटर डिझेल, लुकस कंपनीचे सेल्फ स्टार्टर, ॲमेरॉन कंपनीचे काळे रंगाची बॅटरी व लुमीनस कंपनीचे लाल रंगाची बॅटरी तसेच चार बॅटऱ्याचे केबल असा माल चोरुन नेला असल्याची फिर्याद विक्रांत राजेंद्र सोनवणे रा.गजानननगर कोपरगांव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती, सदर फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तातडीने मा.अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव ,यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी पोसई. नागरे, स.फौ. शैलेंद्र ससाणे, पोना. दारकुंडे, पोकॉ.गणेश मैड पोकॉ.शिंदे, पोकॉ. राम खारतोडे, पोकॉ. कुळधर, पोकॉ.कुंढारे अशाचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन घटनास्थळावर जावुन बारकाईने चौकशी करुन गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन आरोपी अमोल मच्छिंद्र आहेर रा.वाकडी ता.राहता, चेतन अरविंद गिरमे रा.धारणगांव ता.कोपरगांव, राजीवसिंह राम आसरेसिंह रा.मर्गुपुर पोस्ट तेजीबझार जि.जौनपुर राज्य उत्तप्रदेश, अंगदकुमार रामपाल बिंद रा.रामनगर ता.सहागंज जि.जौनपुर राज्य उत्तरप्रदेश अशा चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून २,३६,१५०.(दोन लाख छत्तीस हजार एकशेपन्नास रुपये) किंमतीचा माल त्यात एक टाटा कंपनीचा पिकअप टेम्पो एमएच-१७- अेजी-७६०१, ४प्लॅस्टीकचे मोठे बॅरेल प्रत्येकी २५० लिटर क्षमतेचे त्यात १००० लिटर डिझेल भरलेले, एक काळे रंगाचा ड्रम त्याचे बुडाला छिद्र पडलेले ,३० लिटर डिझेल ,एक ६ फुट लांबीची अर्धा इंच व्यासाची प्लास्टिकची नळी जुनी वापरती असा मला जप्त केला आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. अवघ्या २४ तासात पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या शहर पोलीस पथकाने डिझेलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करून चार जणांना अटक केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.