चांदेकसारेत विविध विकास कामांना सुरुवात

चांदेकसारेत विविध विकास कामांना प्रारंभ

Commencement of various development works in Chandeksara

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18Feb 2021, 20:00

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे  ग्रामपंचायत  अंतर्गत मराठीशाळा गावठाण ते खळवाडी रस्‍ताचे मजबुतीकरण कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ  वाजता सहकार महर्षी शंकरराव कोल्‍हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्‍पासाहेब दंवगे  यांच्‍या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच केशवराव होन, सरपंच सौ.पुनमताई  खरात, उपसरपंच विजय  होन,ग्रामपंचायत सदस्या सौ.मनिषाताई माळी, संचालक संजय होन , रावसाहेब  होन, भाऊसाहेब होन,शिवाजी होन,अर्जुनतात्या होन,अर्जुन होन,राहुल होन,किरण होन,दत्तात्रय होन अदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलताना केशवराव होन म्हणाले की चांदेकसारे गावातील कोणतीही काम असो त्यासाठी ग्रामपंचायत सक्षम आहे. या पंचवार्षिक काळामध्ये विविध विकास कामांचा पाठपुरावा करून ग्रामपंचायत धर्तीवर गावात केलेले विकास कामे आज दिसताहेत. माजी मंत्री शंकरराव कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांचा पाठपुरावा शासन दरबारी करून गावच्या विकासात भर करण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page