विना मास्क’ बाबतची दंडात्मक कारवाई झाली वेगवान, १२ हजार रुपये दंड वसूल
Punishment action without mask was expedited, fine of Rs. 12,000 was recovered
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21Feb 2021, 18:00
कोपरगाव : शहर व तालुका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर ‘मास्क’ (मुखावरण / मुखपट्टी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, तरीही या नियमाचे उल्लंघन करणा-या नागरिकांविरोधात कारवाई तीव्र आणि वेगवान करण्यात आली आहे. या अंतर्गत २० फेब्रुवारी २०२१ रोजी शहर व तालुका पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ११४ नागरिकांना नागरिकांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १२ हजार ४०० रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
कोपरगाव शहरात शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क’चा वापर न करणा-या ८० नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून आठ हजाराचा दंड वसूल केला आहे तर दुसरीकडे ग्रामीण पोलीस स्टेशन मे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चांदेकसारे झगडेफाटा येथे तब्बल ३४ जणांवर कारवाई करत ४४०० दंड वसूल केला आहे.
‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर ‘मास्क’ (मुखावरण / मुखपट्टी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ‘मास्क’चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये २०० इतका दंड आकारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जनजागृती देखील करण्यात आली आहे. असे असले तरी त्याचे गांभीर्य समजून न घेता मास्क वापर नियमाचे उल्लंघन करणा-या नागरिकांविरोधात प्रारंभापासूनच कारवाई करण्यात येत आहे. आता ही कारवाई अधिक तीव्र व वेगवान झाली आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून ‘फेस-मास्क’ घालूनच बाहेर पडावे, ‘मास्क’चा वापर करण्यासोबतच हातांची स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुणे, सार्वजनिकरित्या वावरताना सुरक्षित अंतराचे पालन करणे, ही त्रिसुत्री सर्व नागरिकांनी पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन महसूल विभाग तहसीलदार योगेश चंद्रे व आरोग्य विभाग वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांचेकडून यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.