कोपरगावात १७ कोरोना अहवाल निगेटिव्ह, तर ३२ अहवाल प्रतिक्षेत ; १४ रूग्णांना डिस्चार्ज

कोपरगावात १७ कोरोना अहवाल निगेटिव्ह, तर ३२ अहवाल प्रतिक्षेत ; १४ रूग्णांना डिस्चार्ज

कोपरगाव :

जिल्हा शासकीय रुग्णालय नगर येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या ४९ अहवालांपैकी १७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३२ अहवाल प्रतिक्षेत असून १४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, डॉक्टर व मुंबईचा पाहुणा या दोघांच्या संपर्कात आज पर्यंत आलेल्या ४९ संशयीत रूग्णाच्या साखळीत शनिवारी (४ जुलै) २१ जणांचे रविवारी (५ जुलै) १९ जणांचे तर सोमवारी (६ जुलै) ९ जणांचे अहवाल असे ४९ जणांचे तपासासाठी जिल्हा रुग्णालय नगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापैकी सोमवारी (६जुलै) रोजी १७ अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. उर्वरित ३२ अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशा १४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यात दोन जणांवर नगर येथे तर उर्वरित सहा जणांवर कोपरगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टर फुलसौंदर यांनी दिली आहे कोपरगाव कोविड सेंटरमधील ३२ रुग्णांवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page