संजीवनी अकॅडमीमध्ये मराठी गौरव दिन
Marathi Pride Day at Sanjeevani Academy
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28Feb 2021, 19:30
कोपरगांव: संजीवनी अकॅडमी मध्ये कवी कुसूमाग्रजांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन प्रा. शिला गाडे व प्रसिध्द कवी राम थोरे यांचे हस्ते सरस्वती पुजन आणि दिप प्रज्वलन करून साजरा करण्यात आला . यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम उपस्थित होत्या.
प्रा. शिला गाडे म्हणाल्या, की मराठी भाषेच्या अनेक उपभाषा आहेत व या द्वारे मराठी भाषा जतन केली जात आहे. मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात जाणिवपुर्वक उपयोग करून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आपणच आपल्या भाषेचा अभिमान ठेवणे गरजेचे आहे. कवी श्री राम थोरे यांनी विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांचे व भाषणांचे कौतुक केले. त्यांच्या काही निवडक कवितांचे वाचन करून ते म्हणाले की मातृभाषेचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता वाचन, पोवाडे व भाषणे सादर केली. निलांबरी मेमाणे, स्नेहा जाधव यांनी मराठी भाषेची महती दिली. परीमल आदिक याने निवडक चित्रपटातील संवाद सादर केले. ज्ञानेश्वरी आव्हाड हिने कुसूमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. तसेच आदिती कोळपे, श्रेया संदिप शिंदे , श्रावणी थोरात व स्वरा कोकाटे यांनी मराठी कविता सादर केल्या. श्वेता मोरे हिने मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर कसा करावा या बाबत आवाहन केले. मराठी दिना निमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यामध्ये इ. ५ वीच्या वैदेही सोनवणे, स्नेहा जाधव, अनुष्का शिंदे , सई पोचाळ, इ. ६ वीच्या सृष्टी रूपेश पारख, आरूशी आहेर, श्रृती गांगुर्डे व इ. ७ वीच्या आरती कारवा, सई खालकर, मनस्वी राजेश परजणे व प्राप्ती बुधवंत यांचा समावेश होता.