महिला दिन : विचारांतील उर्जा व्यक्तिमत्वातून दिसून येते- सरला दीदी
Women’s Day: The energy in thoughts is reflected in the personality – Sarla Didi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12March 2021, 19 :00
कोपरगाव:‘प्रत्येक व्यक्तीच्याविचारांवर सुख, दु:ख अवलंबुन असतात. प्रत्येक नात्यात सुख असले पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. विचारांतूनच उर्जा बनते आणि ती उर्जा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते.असे विचार राजयोगिनी ब्रम्हकुमारी सरला दीदी यांनी मंगळवारी (९ ) रोजी जागतिक महिला दिन व महाशिवरात्री निमित्त निवारा येथे वीरशैव महिला मंडळ आणि श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
सरला दीदी पुढे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर सुख, दु:ख अवलंबुन असतात. प्रत्येक नात्यात सुख असले पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. सर्व शिवाच्या शक्तीपासून तयार होते. शिवाची शक्ती म्हणजे आत्मा होय. आत्म्यापासूनच विचार तयार होत असतात. सर्व विचार हे व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून असते.’‘नारी अबला होती.परंतु शिक्षण व विचाराने ती आता सबला झाली असून पाळण्याची दोरी सांभाळण्याबरोबरच कुटुंबासोबतच आता जगाचे नेतृत्व करत आहे. असे ही त्यांनी सांगितले. समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयटे यांनीही महिला सशक्तीकरण या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी वीरशैव महिला मंडळाच्या संस्थापिका सौ.सुहासिनी कोयटे, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार तसेच निवारा, परिसरातील महिला, वीरशैव महिला मंडळ, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. प्रास्ताविक अध्यक्षा सौ. दिपाली नलगे यांनी केले. तर सौ.सुहासिनी कोयटे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सौ. स्वाती कोयटे यांनीही महिला सशक्तीकरण या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सौ.प्रिती साखरे, सौ.अर्चना नीलकंठ यांनी केले. कार्यक्रमासाठी विष्णुपंत गायकवाड, सौ.नंदिनी कदम आदिंनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार सौ. दिपाली नलगे यांनी मानले.