घरफोडीतील एक २४ तासात जेरबंद; राहाता येथील गुन्हयाची कबुली

घरफोडीतील एक २४ तासात जेरबंद; राहाता येथील गुन्हयाची कबुली

One burglary arrest within 24 hours; Confession of crime at Rahata

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12March 2021, 20 :30

कोपरगाव: दुकानाचा पत्रा कापून , घरफोडी करणाऱ्या चोराचा कोपरगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेज वरून चोवीस तासाच्या आत गजाआड केले आहे. राहाता येथील दुकानाचा पत्रा कापुन चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. संजय अर्जुन पाटील(४०) राहणार शिरूर नाका शिवाजी नगर अमळनेर जिल्हा जळगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील रक्कम वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी, एक मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील येवला रोडवर चंद्रहास पैठणी, कोपरगाव साडी सेंटर, यमाहा बाईक, व समर्थ इलेक्ट्रिकल या चार दुकानांच्या दुकानांचे पत्रे कापून आत प्रवेश करून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल संजय पाटील याने चोरून नेला होता. याप्रकरणी मनोज लक्ष्मीनारायण जोशी यांनी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच आरोपी संजय पाटील यांनी १० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास चंद्रहास पैठणी शोरूम व कोपरगाव साडी सेंटर या दोन्ही दुकानांचा पत्रा कापून दुकानातून २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिसांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटा संजय पाटील यांनी अंगावर साडी घालून चोरी केल्याचे दिसून आले, त्याआधारे शहर पोलिसांनी अशोका हॉटेल ते साई कॉर्नर या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले, एका गुप्त बातमीदारामार्फत शहर पोलिसांना आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी संजय अर्जुन पाटील असल्याची माहिती मिळाली, सदर आरोपी चा तपास करताना कालिकानगर शिर्डी परिसरात आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले त्याने अशाचप्रकारे राहाता येथील पत्रा कापून चोरी केल्याची कबुली दिली.सदर कारवाई पोलिस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सौ दिपाली काळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर नागरे पोलीस कॉन्स्टेबल दिलिप तिकोणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल राजू पुंड, पोलीस कॉन्स्टेबल सुरज अग्रवाल, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे यांनी कारवाई केली आहे. सदर आरोपी चा तपास करताना कालिका नगर शिर्डी परिसरात आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले त्याने अशाचप्रकारे राहाता येथील पत्रा कापून चोरी केल्याची कबुली दिली कोपरगाव शहर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page