चोरीच्या दुचाकीवर फिरणारा जेरबंद
Arrested on a stolen two-wheeler
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12March 2021, 20 :40
कोपरगाव : दुचाकी चोरून फिरणाऱ्या एकास कोपरगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) सकाळी जेरबंद केले. आरोपी अर्शद इलियास बागवान (१९) (रा. संजय नगर कोपरगाव) याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
आयेशा कॉलनी कोपरगाव येथे राहणारे मजहर महेबुब आत्तार यांच्या घरासमोर लावलेली काळे रंगाची होंडा शाइन एमएच-१७ सिजे १३२९ ही दिनांक २३ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा ते २४ फेब्रुवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान चोरी गेली होती. याबाबत कोपरगाव शहर पोलीसात दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता याबाबत गुप्त माहितीद्वारे पोलिसांना खबर मिळाली की, दुचाकी चोर अर्शद इलियास बागवान हा गुरुवारी ११ मार्च रोजी चमडा बाजार येथे येणार आहे, सकाळ पासून पोलिसांनी पाळत ठेवली, सायंकाळी साडेसात पावणे आठ वाजेच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी आला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी काही अंतरांवर पाठलाग केल्यानंतर त्या दुचाकीस्वार हर्षद बागवान यास दुचाकीसह ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सौ दिपाली काळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिलिप तिकोणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी कारवाई केली आहे.