शॉर्टसर्किटमुळे कोपरगावात सराफ दुकानाला आग
A short circuit caused a fire at a jewelery shop in Kopargaon
कोपरगाव : छ. शिवाजी महाराज रोड , कोपरगाव शहर येथील मंगलयोग अलंकार ज्वेलर्स या सराफाच्या दुकानाला शुक्रवारी (१२) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भिषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व सामान जाळून खाक झाले . ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
कोपरगाव शहरातील सराफ बाजार येथील योगेश व मंगेश दत्तात्रय निकुंभ या सराफ बंधूंच्या मालकीचे हे दुकान आहे.
योगेश निकुंभ हे यांच्या मंगलयोग अलंकार ज्वेलर्सचे दुकान बंद करून घरी गेले असता काही वेळाने ही आग लागली. ही आग विझविण्यासाठी नागरिकांनी जवळील असलेल्या बोअरवेलच्या पाण्याने आग विझवली.
याघटनेची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळताच ते व त्यांचे सहकारी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझविण्याकरिता पालिकेच्या अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले मात्र या मार्गावर असलेल्या अडथळ्यामुळे अग्निशामक येण्यास विलंब झाला अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन उष्णतेने दुकानावरील पत्रे दुकानातील साहित्य गरम झाल्याने ते थंड करण्याचे कार्य अग्निशामक दलाने केले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून दुकानातील सर्व वस्तू मात्र या आगीत खाक झाल्या होत्या.मात्र या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.