मनी मंगळसूत्र  चोरणा-या  दोघांना २४ तासात अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी

मनी मंगळसूत्र  चोरणा-या  दोघांना २४ तासात अटक, तीन दिवसाची पोलीस कोठडी

Two arrested for stealing money Mangalsutra in 24 hours, three days police custody

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13March 2021, 20 :00

 कोपरगाव : मंगळसूत्र पळविणाऱ्या २ चोरांना कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे.

तालुक्यातील कासली गोधेगाव रोड, शेतगट नं २०७/३, गोधेगाव ११ मार्च रात्री पावणे आठ वाजेचे सुमारास घरात फराळ करत असतांना यातील तीन अनोळखी आरोपींनी घरात प्रवेश करून माल बताओ माल असे म्हणून फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील ६०००/- किंमतीचे दिड ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून फिर्यादीस चाकूने जखमी करून मारहाण करून ऐवज लुटून नेले होते . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हा दाखल झाल्यानंतर कांही तासातच पोलीसांनी आरोपीची शोधमोहिम गोधेगांव शिवारात सुरु केली कासली रोडच्या कडेला संशयित लपल्याची माहिती मिळाल्यानंतर समाधान गोरख ठोंबरे (१९) रा.आंचलगांव यांस ताब्यात घेतले त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने ॠषिकेश शंकर पठाणकर रा.लिफ्ट टाकळी व राजेंद्र लक्ष्मण जाधव अशी आणखी नावे समजली पैकी ॠषिकेश व समाधान यांना अटक झाली त्यांचेकडून दिड ग्रॅमचे सोने मोटर सायकल जप्त केली. त्यांना कोपरगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेपुढे हजर केले असता त्यांना १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page