माजी आमदार सौ. कोल्हे यांनी दिलेला “तो” शब्द पूर्ण केला – सौ अनिता उगले
Former MLA Mrs. Kolhe fulfilled the word “he” – Mrs. Anita Ugale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13March 2021, 20 :30
कोपरगाव : तालुक्यातील रवंदे हनुमानवाडी ते मळेगाव थडी या दुर्लक्षित रस्त्याचे काम पूर्ण करून दिलेला माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी “तो” शब्द पुरा केला असल्याचे प्रतिपादन मळेगाव थडीच्या सरपंच सौ अनिता किरण उगले यांनी केले.
कोपरगाव मतदार संघातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मळेगाव थडी येथील रस्त्याची मोठया प्रमाणात ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार सन २०१८-१९ च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या कामाचा समावेश करून घेतला. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून या कामासाठी सौ कोल्हे यांनी सुमारे २ कोटी ६४ लाख १९ हजार रूपये इतका निधी मंजूर करून आणला. या निधीतून रवंदे हनुमानवाडी ते मळेगाव थडी रस्ता ग्रामीण मार्ग १२ या सुमारे ५ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुर्ण काम पुर्ण करून सौ कोल्हे यांनी खरा केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार असेही सौ उगले यांनी सांगितले.





