शेतकऱ्यांचा कांदा सरकारने शाश्वत हमीभावाने खरेदी करावा – सौ. स्नेहलता कोल्हे
कोपरगांव : कांद्याला भाव मिळत नाही, कांदा उत्पन्नातून लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने आर्थिक कला मोडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने शाश्वत हमीभाव देवुन कांदा खरेदी करावा अशी मागणी प्रदेश सचिव माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
मागील वर्षी अवकाळी पावसाने दोन तीन वेळा टाकलेली कांदा रोप नष्ट झाल्याने अत्यंत महागाचे कांदा बी व कांदा रोपं विकत घेऊन कांदा लागवड केली, प्रतिकूल हवामान खते व औषधांवर जादा खर्च करावा लागला आहे. कांदा काढणी चालू असताना नेमकी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता.
एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे कांद्याचे कोसळलेले बाजार भाव जुलै संपत आला तरी कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याने अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी प्रदेश सचिव माजी आ सौ. कोल्हे यांनी केली आहे.