पाटबंधारे ढिम्म : चढाचा फाटा चारीचे काम लोकवर्गणीतून

पाटबंधारे ढिम्म : चढाचा फाटा चारीचे काम लोकवर्गणीतून

Irrigation Dhimma: The work of climbing  from the people

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13March 2021, 20 :40

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा परिसरात नऊ चारी वाहते. चढाचा फाटा म्हणून ओळख असलेल्या चारीचे काम काल लोकवर्गणीतून सुरू केले. चाऱ्यांची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने करायला पाहिजे मात्र ढिम्म असलेल्या विभागाने याकडे पूर्ण कानाडोळा केला आहे.

जवळपास शंभर एकर भरणं असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत नवचारीची पोटचारी जेसीबी मशीनने उकरण्याचा निर्णय घेतला. लाभक्षेत्रातील शेतकरी व्ही. टी. होन, कल्याण होन, भिमाजी होन,अरूण होन,भीमभाऊ होन, किरण होन , चंद्रकांत होन, राजेंद्र जगताप, पांडुरंग होन यांनी एकत्रित लोकवर्गणीतून चारीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. गोदावरी कालव्याला जवळपास शंभर वर्षे पूर्ण झाले मग चाऱ्यांची यांची अवस्था काय असेल हे सांगायलाच नको. पूर्वी रोजगार हमी योजनेमार्फत गोदावरी कालव्याचे व लाभक्षेत्रातील चाऱ्यांचे रुंदीकरण व खोलीकरण केले जायचे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याकडे शासनाचा कानाडोळा झाला आहे. गोदावरीउजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मेन चा-यांची अवस्था वाईटच आहे. मात्र पोटचारी पूर्णच नादुरुस्त झाली असून या चारीने शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पाटबंधारे विभागाने दिलेले पाणी या पोटचारीतुन अनेक शेतात गळती होऊन गेले जाते.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी आणायचे म्हटले की मोठा प्रश्न निर्माण होतो.या सर्व गोष्टी पाटबंधारे विभागाने केल्या पाहिजे मात्र पाटबंधारे विभाग फक्त सात नंबर फार्म भरून घेण्यातच मशगुल असतो. आधी पाटपाणी बाकी मंग सात नंबर अर्ज स्वीकारला जातो ही इंग्रज कालीन नीती त्यांनी आजही जोपासली आहे.पूर्वी कोपरगाव तालुक्याचे कामधेनू म्हणुन ओळख असलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यामार्फत कारखान्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मागणी केल्यानंतर ही कामे केली जायची जास्तीत जास्त तालुक्‍यात ७ नंबर फार्म कसे भरले जाईल हे देखील कारखान्यावर ठरले जायचे त्यामुळेच या परिसरात ऊस क्षेत्र जास्त असायचे. मात्र याकडेही आता दुर्लक्ष झाले आहे.गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील चाऱ्याची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने केली पाहिजे मात्र केवळ पाणीपट्टी वसूल करण्यात ते धन्यता मानतात अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्ही. टी. होन व भिमभाऊ होन यांनी व्यक्त केल्या .

Leave a Reply

You cannot copy content of this page