कोरोना लस नोंदणीसाठी संजीवनी ई बस आपल्या दारी

कोरोना लस नोंदणीसाठी संजीवनी ई बस आपल्या दारी

Sanjeevani e bus at your door for corona vaccine registration

“आता वाढदिवस नको, वृक्ष लावूया, शैक्षणीक साहित्य वाटू’या !

No more birthdays, let’s plant trees, let’s share educational materials!

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14March 2021, 15 :00

कोपरगांव: मतदार संघातील खेडोपाडी, वाडया- वस्तीवरील वयोवृद्ध यांची कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संजीवनी ई बस आपल्या दारी हा अभिनव उपक्रम कोल्हे कुटूंबियांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (१३ मार्च) रोजी ब्राम्हणगांव येथे १५० व्यक्तींच्या नाव नोंदणीने करण्यात आली असून या उपक्रमासाठी तरूणांनी सहकार्य करावे, असे आवाहन युवा नेते संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी केले आहे.

ही लस विनामुल्य देण्यात येणार असुन नोंदणीकृत व्यक्तींना लसी करणासाठी कोठे व कधी जायचे, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

संजीवनी फाऊंडेशनद्वारे कोविड १९ च्या संवेदनशिल सुरूवातीच्या काळात अन्नदान, स्थलांतरीत कामगारांसाठी प्रवासची सोय, औषधे, किराणा, भाजीपाला, अर्सेनिक अल्बम गोळ्या , इत्यादींचे वाटप, रोजगार मेळावा, पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण , असे अनेक उपक्रम राबवुन शक्य तितक्या गरजुंना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कोरोनाचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सुमित कोल्हे यांनी त्यांचा आज ( १४ मार्च) असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असुन आता वाढदिवस नको, वृक्ष लावू,शैक्षणीक साहित्य वाटू असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे तरुणांमध्ये जोरदार स्वागत होत आहे

 

Leave a Reply

You cannot copy content of this page