धावपटू फैयाज तांबोळी याची भरारी अभिमानाने मान उंचावणारी- विवेक कोल्हे

धावपटू फैयाज तांबोळी याची भरारी अभिमानाने मान उंचावणारी- विवेक कोल्हे

Vivek Kolhe proudly honors runner Fayyaz Tamboli

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14March 2021, 20 :00

कोपरगाव: टाकळी सारख्या ग्रामीण भागातून देशाचे प्रतिनिधित्व करून देशासाठी गोल्ड मेडल मिळवून देणारा धावपटू फैयाज तांबोळी या खेळाडूने थक्‍क करणारी कामगिरी करत खूप मोठी भरारी घेतली आहे. हे यश आपल्या सर्वांची अभिमानाने मान उंचावणारे आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक युवानेते विवेक कोल्हे यांनी रविवारी (१४) रोजी टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित विवेकभैय्या चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.

विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगावच्या उदयोन्मुख खेळाडूंत कमालीचा आत्मविश्‍वास असून त्याच्याच जोरावर ते सातत्याने यशस्वी होत आहे. त्यांच्यातून उद्याचे टॉप खेळाडू गवसणार आहेत. क्रिकेटकडे वळणाऱ्यांनी अशा खेळाडूंसाठी देखील मदतीचा हात पुढे करायला काय हरकत आहे. मदतीचा हात पुढे केला तर त्यांचा आत्मविश्‍वास अधिक उंचावेल व खेळ देखील आणखी बहरेल.देशपातळीवर जाण्यासाठी अशा खेळाडूंना आपण सहकार्य करणार त्यांनी सांगितले. या प्रसंगी दत्ता काले,आयोजक अशोक लकारे,विनोद राक्षे, शिवाजी खांडेकर,रवींद्र रोहमारे,अल्ताफभाई कुरेशी,अविनाश पाठक,सोमनाथ अहिरे, पिंटूभाऊ नरोडे,नरेंद्र लकारे,जालिंद्र शिंदे, सतीश रानोडे,शंकर बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजक अशोक लकारे,प्रा.कुटे सर,जगदीश लकारे,सचिन लकारे,रवींद्र लचूरे,कन्हैया गंगूले,स्वराज लकारे,ओंकार जाधव,ईश्वर लकारे,कुणाल गंगूले,आनंद राक्षे,सागर ढोणे,विशाल लकारे,बजरंग जाधव,राहुल आढाव,शमीत माळी,राजेंद्र मेहरे,किशोर लकारे,जितू पंजाबी,सिद्धश लकारे,हर्षद लचुरे,अलतमेज शेख,असिफ शेख,दादा मुसमाडे,हरिहर जाधव,रोहन लकारे,आशिष मेहत्रे,संदीप दुधाळ,सोमनाथ शिंदे,वसीम पटेल,विजय डांगे,अशोकभाऊ पवार,सुमित खरात,शाम पंडोरे,आकाश लकारे आदींसह टिळक चौक क्रिकेक क्लबच्या अनेक युवकांनी विवेकभैय्या चषकाचे उत्तम आयोजन केले होते..

Leave a Reply

You cannot copy content of this page