बुधवारी कोपरगावात ११७ कोरोना रुग्ण आढळले
On Tuesday, 117 corona patients were found in Kopargaon
कोपरगाव : बुधवारी (१७) रोजी खाजगी रुग्णालयातील ७४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर नगर येथे पाठविलेल्या ८५ तपासण्यापैकी ३६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर रॅपिड टेस्ट मधील १२ जणांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
बुधवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९. ५० टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ १५. ७७ टक्के कोरोनामुळे मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.३९ टक्के इतकी आहे. बुधवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ३६ रुग्णावर उपचार सुरु आहेत. डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. आज पर्यंतचे कोपरगाव कोरोना अपडेट : २२२७८ स्वॅब तपासणी यात ६३७८ नगर, रॅपिड टेस्ट १५९००, निगेटिव्ह तर ३५१३ पॉझिटिव्ह, ३१४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ४९ जणांचा मृत्यू, ३६ रुग्णावर उपचार सुरू आहेत. आज बुधवारी (१७) रोजी सापडलेल्या ११७ पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर संपर्क साधण्यात आला असून त्यांना उद्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, एस एस जी एम कॉलेज मध्ये १६० बेड , मूकबधिर विद्यालय ५० तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ३२ असेही एकूण २४२ बेड आहेत. ज्यांना कोरोनाचे लक्षण असल्याची शंका असेल कींवा जे पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये, कारण त्यांच्या फिरण्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच जे रुग्ण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह सापडले आहेत,व जे त्यांच्या संपर्कात आले अशा लोकांनीही स्वतःची काळजी घेऊन स्वतःला क्वॉरनटाईन करून घ्यावे, उगाच इकडेतिकडे फिरू नये असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.