सी.डी.ओ. अधिकाऱ्यांनो पाच नंबर तलावाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करा – आ. आशुतोष काळे
अधिकाऱ्याकडून एक महिन्याच्या आत तयार करण्याचे आश्वासन
कोपरगाव
कोपरगाव शहरातील नागरिकांची तहान भागविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचा आराखडा व अंदाजपत्रक तातडीने तयार करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी सी.डी.ओ. (मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) च्या अधिकाऱ्यांना कोपरगाव येथील बैठकीत दिल्या.
तत्पूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषद यांच्या संयुक्तिक बैठकीत सी.डी.ओ च्या अडचणीबाबत आ. काळे यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत आराखडा व अंदाजपत्रकाबाबत या बैठकीत विस्तृत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठक आटोपल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी सी.डी.ओ.) संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदकामाची पाहणी केली. पाच नंबर साठवण तलावाचा आराखडा व अंदाजपत्रक एक महिन्याच्या आत तयार करू असे सी.डी.ओ.च्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
साठवण तलावाच्या पुढील काम सुरु होण्यासाठी आजपर्यंत झालेल्या बैठकीत सकारात्मक मार्ग निघाले असून त्या माध्यमातून साठवण तलावाच्या कामाला गती मिळणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले आहे.
यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सी.डी.ओ. (मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) चे अधीक्षक अभियंता मुंदडा, कार्यकारी अभियंता विझे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता दिगंबर वाघ, अभियंता ऋतुजा पाटील, कर निरीक्षक ज्ञानेश्वर चाकने, मानवसेवा कन्सल्टिंगचे राजेंद्र सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभा शिलेदार, हिरामण गंगूले, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी उपस्थित होते.
चौकट – निवडणुकीपूर्वी मोफत काम करण्यास नकार देणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतेही आढेवेढे न घेता विनाशर्त पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण करून दिले असून यापुढील कामाला चालना मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.