संजीवनी  सभासद व कामगारांना मोफत कोविड १९ लसीकरण .

संजीवनी  सभासद व कामगारांना मोफत कोविड १९ लसीकरण .

Free Kovid 19 vaccination to Sanjeevani members and workers.

निमित्त : माजी मंत्री शंकरराव कोल्हे  यांचा वाढदिवस Reason: Former Minister Shankarrao Kolhe’s birthday

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20March 2021, 17 :00

कोपरगाव : सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माजी मंत्री शंकरराव कोल्हे  यांच्या वाढदिवसानिमित्त सभासद व कामगारांना मोफत कोविड १९ चे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ युवानेते,  जिल्हा  बॅंकेचे संचालक विवेक  कोल्हे यांचे हस्ते करण्यात आला.

आजाराचे प्रमाण वाढत असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर वापरावे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन यावेळी  विवेक कोल्हे यांनी केले.

या शुभारंभ प्रसंगी  कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे, संचालक संजय होन, प्र.कार्यकारी संचालक आर के सुर्यवंशी, सेक्रेटरी टी आर कानवडे, कामगार संघटनेचे मनोहर शिंदे, लेखाधिकारी एस एन पवार आदी उपस्थित होते.

देशासह राज्यभरात कोरोना विषाणूने थैमानाच्या  पार्श्वभूमीवर संजीवनी उदयोग समुहाने लसीकरणासाठी पुढाकार घेतला असुन सभासद व कामगारांना मोफत लस देण्यास सुरूवात केली आहे.

तालुक्यातील आत्मा मालिक हाॅस्पीटल व संत जनार्दन स्वामी हाॅस्पीटल या ठिकाणी सभासद व कामगारांना ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी कारखाना कार्यस्थळावरून बसद्वारे उपरोक्त रूग्णालय येथे सभासद व कामगार यांना घेऊन जाणार आहे.

संजीवनी उदयोग समुहाने गेल्या वर्षभरापासून कोविड १९ या आजारापासून सरंक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहे. कोपरगाव शहरात औषध फवारणी, मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप, नगरपालिका कर्मचा-यांना सरंक्षक किट तसेच सभासद व कामगारांना मोफत मास्क,सॅनिटायझर वाटप केलेले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रूग्णांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था करून रूग्णांसाठी वाफेचे मशीन आदी साहित्याचा पुरवठा करून  महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page