कोल्हे व काळे यांच्याप्रमाणे जिल्हा बॅंक हिताची परंपरा जपण्यासाठी सेवक म्हणून कटीबध्द-विवेक कोल्हे

कोल्हे व काळे यांच्याप्रमाणे जिल्हा बॅंक हिताची परंपरा जपण्यासाठी सेवक म्हणून कटीबध्द-विवेक कोल्हे

Like Kolhe and Kale, Vivek Kolhe is committed to preserve the tradition of District Bank interests.

विविध सोसायटी व शाखांची आढावा बैठक

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 20March 2021, 17 :30

कोपरगाव : शेतक-यांचा आर्थीक कणा असलेली व आदर्श बॅंक म्हणून नावलौकीक मिळविलेल्या जिल्हा बँकेचे हित जपण्यासाठी राजकीय जोडे बाजुला ठेवून माजी मंत्री शंकरराव कोल्हे व स्व.शंकरराव काळे यांनी काम केले आहे, तीच परंपरा यापुढेही संचालक म्हणून नव्हे तर सेवकाच्या भुमिकेतून जपण्यास आम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही कोपरगाव येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहातील विविध सोसायटी व शाखांची आढावा बैठकीत संचालक विवेक कोल्हे यांनी  दिली.यावेळी ३१ मार्चअखेर वसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तालुका विकास अधिकारी कैलास गवळी, वसुली अधिकारी ए.आर.लोहकरे, मुख्य कार्यालयाचे शेती कर्ज विभागाचे श्री पवार, सहनिबंधक कार्यालयाचे श्री रहाणे, नोडल अधिकारी एस.ए.शिंदे आदीसह विविध विकास सेवा सोसायटीचे सचिव, शाखाधिकारी, निरीक्षक यावेळी उपस्थित होते.

यावेळी संचालक विवेक कोल्हे यांचा कोपरगाव जिल्हा बँक व सचिव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 विवेक कोल्हे पुढे  म्हणाले, बॅंकींग क्षेत्रातील दीर्घ अनुभवी अध्यक्ष असुन त्यांच्या अनुभवाचा बॅंकेला निश्चित फायदा होणार आहे. या संस्थेवर अनेक शेतक-यांची कुटूंबे अवलंबून आहेत. त्यामुळे बॅंकेचे हीत जोपासण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकास सोसायटी संस्था सक्षम झाल्या तर जिल्हा बॅंक सक्षम होईल. त्यामुळे सोसायटयांनी नफा वाढविण्याच्या दृष्टीने व्यवसाय निवडावे. जिल्हयामध्ये कोपरगाव तालुक्यातील शाखांची परिस्थिती निश्चितच चांगली आहे. परंतु याहीपेक्षा चांगले काही करता येईल का ? यासाठी प्रयत्न करावेत. वसुली नवीन तंत्रज्ञानातुन संस्था उत्कृष्ठ करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका विकास अधिकारी कैलास गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page