धोंडेवाडीच्या धर्तीवर १७ पाणीपुरवठा योजना सुरू करा – स्नेहलता कोल्हे
Start 17 water supply schemes on the lines of Dhondewadi – Snehalta Kolhe
महावितरणचा शॅाक! १७ पाणी पुरवठा योजना बंद; आमदार करतात काय ? -स्नेहलता कोल्हे
MSEDCL’s shock! 17 water supply schemes closed; What do MLAs do? -Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 26March 2021, 20 :00
कोपरगाव : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा शॅाक,१५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणी पुरवठा योजना बंद झाल्यात मग आमदार करतात काय ? असा संतप्त सवाल करून आम्ही धोंडेवाडी ची योजना सुरू केली त्याच धर्तीवर १५ ग्रामपंचायतीच्या १७ योजना सुरू ग्रामस्थांना व महिलांना दिलासा द्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आ. काळे यांना एका पत्रकाद्वारे केले आहे.
कोपरगाव मतदार संघात मोहीमेंतर्गत महावितरणने १५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणा-या जलवाहिनींची वीजतोडणी केली आहे. परिणामी वीज तोड केलेल्या अनेक गावांमधील पाणी पुरवठा योजना बंद झाल्याने ऎन उन्हाळ्याच्या तोंडावर नागरीकांना पाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. याचा मोठा फटका सध्या ग्रामीण भागातील नागरीक व महिला भगिनींना ना मोठ्या प्रमाणावर बसला असल्याचे भयावह चित्र आहे. मग तालुक्याचे आमदार करतात काय ? असा सवाल त्यांनी केला गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असून लोकांना आर्थिक उत्पन्नाचा मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीने लोकांना दिलासा देण्याची गरज आहे परंतु या उलट आज ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे आहे. धोंडेवाडी येथील पाणी योजना वीज बिलाच्या थकबाकी पोटी कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती परंतु आम्ही आमदार असताना नागरिकांचा व त्या योजनेवरील गावांचा विचार करून आमचे सरकार असताना महावितरण वीज कंपनी व सरकार यांच्याबरोबर भांडून तडजोड करून ती योजना पूर्ववत सुरू केली होती त्याच धर्तीवर आपण या बंद करण्यात आलेल्या १५ ग्रामपंचायतीच्या १७ योजना तातडीने सुरू कराव्यात. आज सरकार तुमचे आहे ऊर्जामंत्री तुमच्या पक्षाचा व तुमच्याच जिल्ह्यातील आहे तेंव्हा आमदारांनी तातडीने या पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणीही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्याने अंदाजे ३६ लाख रूपयांच्या आसपास बिले थकीत आहेत.यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी थकीत बिल असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडून तो बंद केला आहे. परिणामी नागरीकांना पिण्याच्या पाण्यावाचून वंचित रहावे लागत आहे. यामुळे ऎन उन्हाळ्यांच्या तोंडावर नागरीकांना विहीरीवरून दुरवरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. वीज तोड केलेल्या गावांमध्ये येसगाव, अंचलगाव, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, करंजी, मळेगाव थडी कारवाडी मंजूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, वडगाव, कोळगाव थडी, सडे, धोंडेवाडी आदी ग्रामंपचायतींचा समावेश आहे.