कोपरगाव येथे कु-हाडीने झालेल्या मारहाणीत बापलेक जखमी, पवार बंधू वर गुन्हा दाखल
कोपरगाव :
कोपरगाव शहरातील इंदिरा नगर भागात रविवारी सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या दरम्यान लहान मुलांच्या भांडणातून कु-हाडीने झालेल्या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
यासंदर्भात कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून गणपत अशोक दळे व अजय गणपत दळे असे जखमीचे नाव आहे.
ऋषिकेश गणपत पवार व अभिषेक गणपत पवार अशी आरोपींची नावे आहेत.