समता पतसंस्थेच्या ठेवीत ६८ कोटी रुपयांची वाढ– संदीप कोयटे

समता पतसंस्थेच्या ठेवीत ६८ कोटी रुपयांची वाढ– संदीप कोयटे

Samata Patsanstha’s deposit increase by Rs 68 crore – Sandeep  Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 31March 2021, 18:30 :00

कोपरगाव- ३१ डिसेंबर २०२० रोजी १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करून महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळविलेल्या पतसंस्थेचा ३१ मार्च २०२१ या आर्थिक अहवालात सालाबादप्रमाणे या वर्षी देखील ३१ मार्च रोजीच प्रसिद्ध करण्यात समता पतसंस्थेने आघाडी घेतली असून, गत आर्थिक वर्षात समता पतसंस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल ६८ कोटी रुपयांची वाढ होऊन ठेवी ६०० कोटी ६ लाख एवढ्या झाल्या तसेच कर्ज वाटपामध्ये ७२ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे कर्ज वाटप ४५० कोटी ५५ लाख एवढे झाले असून गुंतवणुक १७५ कोटी ८० लाख एवढी आहे. संस्थेला ३१ मार्च २०२१ अखेर ७ कोटी २० लाख इतका नफा झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

याबाबत अधिक बोलताना ते पुढे म्हणाले कि, ‘गत आर्थिक वर्ष संपत असतानाच लॉक डाऊन जाहीर झाला, तसेच गत वर्षभर कोरोनामुळे सर्वांच्याच व्यवहारांवर परिणाम झाला असताना देखील समताने ठेव वाढ, कर्ज वाढ व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापीत केले आहे. विशेषतः कर्ज वाटपापैकी सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे, समताचे सोनेतारण कर्ज दि.३१ मार्च २०२० अखेर १८ कोटी रुपये इतकेच होते, ते आता १०० कोटी रुपयांचे आसपास जाऊन पोहोचले आहे. सोने तारण कर्जामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जलद सेवा ग्राहकांना देण्याचे काम समता पतसंस्था करीत आहे.’ त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्था सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन हे कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.’
समता पतसंस्थेने वेअर हाऊस कर्ज २७ कोटी तसेच अतिशय नगण्य थकबाकी असलेले मायक्रो फायनान्स मध्ये २५ कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक १७५ कोटी ८० लाख असून गुंतवणूक, सोनेतारण, वेअर हाऊस कर्ज, मायक्रो फायनान्स हे कधीही उपलब्ध होणारे कर्ज एकूण ३२८ कोटी रुपये आहे. एकूण कधीही उपलब्ध होणारे कर्ज गुंतवणुकीचे प्रमाण ५५% इतके आहे. केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास, स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘कॉप शॉप वर्ल्ड’ (Coop shop world) अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून विक्रीस प्रारंभ केला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्वप्रथम आणून समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई शहा यांनी सांगितले.

समताच्या अनेक व्यवसायांविषयी माहिती देतांना समताच्या व्हा. चेअरमन सौ. श्वेता भरत अजमेरे म्हणाल्या कि, ‘समताने गत आर्थिक वर्षात तब्बल ७ कोटी रुपयांच्या नफा मिळविलेला आहे. त्याचबरोबर लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाचे अंतर्गत समता पतसंस्थेच्या ७ लाख रुपया पर्यंतच्या ९८ % ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत.’

‘कर्ज वितरण करताना देखील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणाली यांचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. त्याचप्रमाणे निम्जा (Nimja) सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली ई-नोटीस प्रणाली देखील समताने वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल, शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.’ ‘बँकिंग क्षेत्रात आतापर्यंत कोणीही वापर करत असलेले क्लॉऊड बँकिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून समताचे व्यवहार पूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही गावात असलेले ग्राहक आता करू शकत असल्याने समता पतसंस्था महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील बँकिंग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी सर्वोच्च संस्था ठरेल अशी खात्री संस्थेचे सर व्यवस्थापक सचिन भट्टड यांनी दिली.’

समताची कर्ज वसुली देखील समताचे टीमने कोरोना व लॉक डाऊनचे काळात अतिशय शांत व संयमी पद्धतीने केली असून एकही थकबाकीदाराची तक्रार न येऊ देता अत्यल्प एन.पी.ए. ठेवण्यात यश आल्याची माहिती समताचे वसुली विभागाचे अधिकारी जनार्दन कदम यांनी दिली.

समताच्या या यशामध्ये समताचे २५० चे वर संख्येने असेलेले कर्मचारी, अधिकारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे समता कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान पठारे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page