कोपरगाव शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
Kopargaon Shiv Sena celebrates Shiv Janmotsav with enthusiasm
कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव निमित्त कोपरगाव शिवसेनेकडून कारोनाचे सर्व नियम व अटी पाळून पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पाच जोडप्यांच्या हस्ते महामस्तक अभिषेक करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे सर्व कार्यक्रम रद्द करून कोपरगाव शिवसेनेकडून कोपरगाव शहर पोलीसांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिसांच्या कारवाईत जे नागरिक विना मास्क आढळून येतील त्यांच्यासाठी देखील अतिरिक्त मास्क कोपरगाव शहर पोलीस स्टेशन कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी राजेश्वरी होने या चिमुकल्या मुलीने छत्रपती शिवरायांवर अतिशय सुंदर शब्दात भाषण करून सर्वांचे लक्ष वेधले व शाबासकी मिळवली. कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच रिक्षा स्टँड येथे छ.शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिस्त पुतळ्याला फुलांची आरास करून अतिशय सुंदर पद्धतीने सजविण्यात आले. यावेळी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विधानसभा संघटक अस्लम शेख,युवासेना सहसचिव सुनील तिवारी, बाळासाहेब जाधव,दिलीप अरगडे, दिलीप सोनवणे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, गगन हाडा, विक्रांत झावरे, नितीन शिंदे, बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत राहुल हंस्वाल, पप्पू पेकळे, अविनाश धोक्रट, किरण कुऱ्हे,राकेश वाघ,जाफर सय्यद,सतीश शिंगाणे,अविनाश वाघ, बंटी बाविस्कर, अंबादास वाघ,प्रवीण शेलार, अशोक पवार, उमेश छुगानी, सतीश खर्डे, भूषण वडांगळे, विशाल झावरे,वेदांत कर्पे, दिपक राजपूत, गणेश साळुंके,ओम साळुंके, पिंटू पावशे, नगरसेविका वर्षा शिंगाडे,अश्विनी होने, तनुजा शिलेदार आदी शिवसैनिक उपस्थित होते.