कोपरगाव पालिका कर्मचा-यांकडून  काळ्या फिती लावून शासनाचा निषेध

कोपरगाव पालिका कर्मचा-यांकडून  काळ्या फिती लावून शासनाचा निषेध

Kopargaon Municipal Corporation employees protest against the government by putting up black ribbons

आज १ एप्रिल आंदोलनाचा पहिला टप्पा Today, April 1, the first phase of the movement

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1April 2021, 16:00 :00

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी (ता.१) रोजी पालिकेत काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या टप्यात  राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.


पालिका,महापालिका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित पडल्या आहेत.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी १ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध केला. 

पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले. राज्य शासनाकडे सादर केलेल्या निवेदनात राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत मध्ये कार्यरत असणार्‍या नगरपरिषद आस्थापनेवरील व राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी  यांचे वेतन सध्याची सहायक अनुदानाची पद्धत बंद करून थेट कोषागारातून करावे,सर्व कर्मचार्‍यांना सेवार्थ प्रणाली लागू करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे ,कर्मचार्‍यांचे विनाअट समावेशन करणे,आश्वासित प्रगती योजना लागू करणे पदोन्नती मुख्याधिकारी पदभार पात्र अधिकारी यांना मुख्याधिकार्‍यांच्या रजा कालावधीत देणे , सेवाविषयक लाभ वेळेवर देणे ,आकृतीबंध सुधारित करणे , वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करणे,कोवीड मुळे मृत कर्मचार्यंच्या  वारस यांना ५० लाख मदत मिळवून देणे  ,सफाई कामगारांना घरे बांधून देणे आदि मागण्यां करण्यात आल्या आहेत. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे , बांधकाम अभियंता दिगंबर वाघ , पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील ,लेखापाल तुषार नालकर, लेखा परीक्षक भीमराव संसारे, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे उपस्थित होते.आज दिवसभर कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम केले. आपल्या मागण्या वेळीच मान्य न झाल्यास अथवा प्रलंबीत राहिल्यास पुढील टप्प्यातील १२ एप्रिल एक दिवस लेखणी बंद आंदोलन १ मे कामगार दिनापासून अत्यावश्यक सेवेत काम बंद आंदोलन  करण्यात येणार आहे असे कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी यांनी संगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page