कोपरगाव पीपल्स बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन संपन्न
72nd Annual General Meeting of Kopargaon People’s Bank held online
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1April 2021, 16:30 :00
कोपरगाव : कोपरगाव पीपल बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (२७) रोजी सकाळी ११ वाजता कोरोना निर्बंध व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या सभागृहात चेअरमन अतूल धनालाल काले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी चेअरमन अतुल काले यांनी मनोगतात बँकेच्या भविष्यातील प्रगती बाबतची रूपरेषा मांडली.
यावेळी व्यासपीठावर बँकेचे विद्यमान चेअरमन अतुल काले व्हाईस चेअरमन सौ प्रतिभा शिलेदार व संचालक मंडळ सदस्य रतनशेठ ठोळे, कैलाशचन्द ठोळे, डॉ. विजयकुमार कोठारी, सुनील कंगले, रवींद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, राजेंद्र शिंगी, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, सत्येन मुंदडा, सुनील बंब, रवींद्र ठोळे, हेमंत बोरावके,सौ. प्रभावती पांडे, संजय भोकरे, प्रसन्ना काला, गिरीश पैठणकर, अशोक पापडीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे आदी उपस्थित होते. बँकेच्या सभासदांना सभेला ऑनलाइन सभेस उपस्थित राहण्यासाठी मोबाईल वर लिंक पाठविण्यात आली होती. या लिंकचा वापर करून अधिकाधिक सभासदांनी सभेला हजेरी लावली. सदर सभेमध्ये काही विषयावर अशोक अजमेरा, सुधीर बजाज व केशव भवर या सभासदांनी ऑनलाइन सभेत सहभागी होऊन काही प्रश्नांवर चर्चा केली त्यांच्या प्रश्नांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे यांनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक उत्तरे दिली. बँकेचे चेअरमन अतुल काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वरिष्ठ अधिकारी वीरेश पैठणकर यांनी बँकेच्या मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले व चंद्रशेखर व्यास वरिष्ठ अधिकारी यांनी आभार मानले.