एका महिन्यातच बेशिस्तपणामुळे ८७७ बहाद्दरांकडून वसुल अडीच लाख प्लसचा दंड !

 एका महिन्यातच बेशिस्तपणामुळे ८७७ बहाद्दरांकडून वसुल अडीच लाख प्लसचा दंड !

One and a half lakh plus fine recovered from 877 heroes

 मास्क परिधान न करणाऱ्या बहाद्दरांवर शहर पोलीसांची धडक कारवाई सुरूच,City police continue crackdown on brave people who do not wear masks,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1April 2021, 20:00 :00

कोपरगाव : शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नवाळे व त्यांच्या पथकाने शहरामध्ये १ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये ८७७ जणांवर मास्क परिधान न केल्याप्रकरणी कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी २ लाख ५६ हजार ७०० रुपये इतका दंड घेतला आहे.

मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे तालुका , पालिका, आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून नागरीकांना मास्क परिधान करण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यास सुरू केले. पण काही नागरीकांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एवढेच नाही, तर मास्क न परिधान न करता फिरणाऱ्या अशा लोकांच्या अशा बेशिस्तपणाचा फटका थेट कोपरगावकरांच्या जीवावर उठत आहे.अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात कोपरगावकरांना मोठया जीवघेण्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भिती आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात शहरात सुरू झालेल्या कोरोना संसर्गाची वाढ सप्टेंबर महिन्यात अक्षरशः शिगेला पोचली होती. त्यानंतर हे प्रमाण हळूहळू कमी झाले होते. मात्र मार्च २०२१ पासून शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळण्यास सुरू झाले. त्यामुळे तालुका , नगरपालिका, आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून पुन्हा एकदा नागरीकांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेस नियमीत हात धूणे याबाबत जनजागृती करण्यास सुरूवात झाली. विशेषतः सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी नागरीकांनी मास्कचा वापर करण्याबाबत प्रशासनाने कडक भुमिका घेण्यास सुरूवात केली. शहरात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने व्यवसाय सुरू ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत . एकीकडे प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड करीत असताना, दुसरीकडे अनेक नागरीक मास्क परिधान करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची सद्यस्थिती आहे. अशा नागरीकांवर शहर पोलिस ठाणे व वाहतुक पोलिसांकडून दररोज नाईलाजाने दंडात्मक कारवाई केली जात आहे.दंडात्मक कारवाई पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून आपल्या जबाबदारीचे भान बाळगले पाहिजे. स्वतःच्या आरोग्यरक्षणाला प्राधान्य देण्यासाठी नागरिकांनी मास्कचा नियमीत वापर करावा. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

कोपरगाव शहर पोलिसांनी मागील वर्षी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो जणांवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसुल केला होता. त्याच बरोबर कायद्याची एक दहशत सुद्धा निर्माण केली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page