जन्मदात्या पित्या कडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी बापाला न्यायालयीन कोठडी

जन्मदात्या पित्या कडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी बापाला न्यायालयीन कोठडी

Accused father remanded in judicial custody for molestation of minor daughter by birth father

शाळकरी मुलीने दिली पोस्टाने तक्रार 

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 2April 2021, 16:00 :00

कोपरगाव :  कोपरगाव तालुक्यातील गावात घरात राहणाऱ्या १४  वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडून विनयभंग केल्याची घटना घडली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपीची १५ दिवसासाठी यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोपरगाव तालुक्यातील एका गावातील  राहवासी असून, आरोपी हा दारूडा आहे  याच्या दारू पायी त्याची बायको त्याला पाच वर्षांपूर्वी  सोडून गेली आहे . सदर पीडित १४ वर्षाची मुलगी ही आजी आजोबा बाप व एका बहिणीसह घरात राहत होती.  २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही रहाते घरात झोपलेली असतांना यातील आरोपीत मजकुर याने फिर्यादीस झोपेतुन उठवले व म्हणाले की   माझे पाय दाबुन दे असे म्हणुन फिर्यादीचे शेजारी येवुन झोपला व त्याने फिर्यादीचे छाती दाबुन फिर्यादीस लज्जास्पद कृत्य केले ही माहिती  या पीडित मुलीने कोपरगाव  तालुका पोलीस ठाण्यास पोस्टाने तक्रार अर्ज करून कळविली  होती तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी स्वतः जातीने तक्रार अर्जाची चौकशी करून  फिर्यादीस फिर्याद देण्याचे कळविल्याने फिर्यादीने गुरुवारी (१ एप्रिल) रोजी  तालुका पोलीस स्टेशन मध्ये   फिर्याद दिली आहे.
 अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी ३५४, ५०६पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी बापाला  अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page