महसूल विभागाचे मौन : जिल्ह्यात राजकीय वरद हस्तक्षेपामुळे; बेसुमार वाळू उपसा थांबवा – राजेंद्र झावरे

महसूल विभागाचे मौन : जिल्ह्यात राजकीय वरद हस्तक्षेपामुळे; बेसुमार वाळू उपसा थांबवा – राजेंद्र झावरे

Revenue department’s silence: due to political interference in the district; Stop excessive sand extraction – Rajendra Zaware

  कोपरगाव : राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असतानाच महसूल विभागाचे मौन, व राजकीय वरद हस्तक्षेपामुळे श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठान येथे शासकीय लिलावातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असून त्यावर कारवाई करून तो थांबवावा अशी मागणी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

राजेंद्र झावरे म्हणाले , श्रीरामपूर येथील मातुलठान येथे गोदावरी नदीतून वाळू उपसा करण्याचा लिलाव सुरू असून तो ठेका घेणाऱ्यांनी चार पट वाळू उपसा केलेला असून वाळू माफियांवर येथील बड्या राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे स्थानिक प्रशासन देखील याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. याठिकाणी औरंगाबाद, नाशिक, सह बाहेरील जिल्ह्यातून वाळूचे दोनशे ते तीनशे ट्रक येत असून त्या बरोबर वाळू माफियांचा लवा- जमा येतो.तसेच तेथील शहर व गावपुढारी देखील २४ तास नदीत असतात त्यामुळे खरा करोना महामारीचा धोका तिथून वाढू शकतो.उद्या लिलावानंतर कोपरगाव श्रीरामपूर, संगमनेर, सिन्नर येथे ही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने त्यात तातडीने लक्ष घालून सदर ठेका बंद करावा, तसेच करोनाचे सावट वाढत असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील व तालुक्यातील ठेके चालू करू नयेत यासाठी जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे असे आवाहन झावरे यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page