लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ट्रामा केअर युनिट रखडले – सौ स्नेहलता कोल्हे

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ट्रामा केअर युनिट रखडले – सौ स्नेहलता कोल्हे

Trauma care unit stalled due to negligence of people’s representatives – Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 2April 2021, 17:00 :00

 कोपरगाव : येथील ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वीच सर्व सोपस्कार पूर्ण केले परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच ट्रामा केअर युनिट रखडले असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

सौ कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव शहरालगत असणा-या प्रमुख राज्य मार्ग १२ व राज्यमार्ग ८ या रस्त्यावर असणारी धार्मिकस्थळे श्री साईबाबा तपोभूमी तसेच ऐतिहासिक कचेश्वर मंदिर, दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर, श्री संत जनार्दन स्वामी समाधीमंदिर तसेच ओमगुरूदेव जंगलीदास माउली आश्रम, तसेच याच रस्त्यावर काही अंतरावर जागतिक किर्तीचे शिर्डी येथील देवस्थान श्री साईबाबा मंदिर येत असल्याने मोठया प्रमाणात भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्याचप्रमाणे शिर्डी येथे पायी पालख्या घेउन जाणारे भाविकही दर्शनासाठी याच मार्गाहून जात असतात. शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने व औदयोगिक वसाहत यामुळे मोठया प्रमाणावर वाहतुक असल्याने दुदैवाने अपघात झाल्यास तातडीने अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालय येथे ट्रामा केअर युनिट व्हावे म्हणून तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे मागणी केली. सर्व कागदपत्रीय सोपस्कार पुर्ण करत सुमारे ९ कोटी रूपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी दिनांक २८ ऑगस्ट २०१९ रोजी जा.क्र.प्रशा-१/३४२५3/सन २०१९ अन्वये अधिक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ, अहमदनगर यांनी सादर केलेले आहे. आचारसंहितेपुर्वी अंतिम टप्प्यात आलेली ही प्रक्रिया पुर्ण करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. आज त्या इमारतीचा उपयोग रूग्णसेवेसाठी झाला असता. असेही सौ कोल्हे म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page