अश्लील व्हिडिओ  व्हायरल करून घेतला बदला; आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी

अश्लील व्हिडिओ  व्हायरल करून घेतला बदला; आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी

Badala  porn videos taken by viral; The accused was remanded in police custody for four days

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3April 2021, 15:30 :00

कोपरगाव :  पुर्वी केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने  तरूणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला याप्रकरणी एकास  गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने  आरोपीस ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इंटरनेटवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याने चुकीचा वापर करून हा गुन्हा केला. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका जणांविरोधात गुन्हा दाखल आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून
गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.  तो राहता  येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   फिर्यादी महिलेच्या घराशेजारी कोपरगाव येथे  राहत असलेल्या   आरोपीने फिर्यादी महिलेशी ओळख केली. एकमेकाच्या जवळ आले,मात्र त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने महिलेने एक वर्षापूर्वी आरोपीविरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. दरम्यान आरोपीने महिलेच्या फोटोची एक अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली. ही व्हिडिओ क्लिप दाखवून आरोपी महिलेस विनयभंगाची तक्रार मागे घे अन्यथा ही क्लिप व्हायरल करेल अशी  धमकी देत होता पण महिलेने जुमानले नाही म्हणून आरोपीने  याने २ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता त्याचे मोबाईलवर फिर्यादिचे अश्लील फोटोचा व्हीडीओ तयार करुन  लिंक वर प्रसारीत केला व फिर्यादिची बदनामी करुन फिर्यादिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादिचा विनयभंग केला.
 याबाबत महिलेने कोपरगाव शहर पोलिसात धाव घेत २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा नोंदवला. याप्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले स्वतः तपास करीत असून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर  हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  

Leave a Reply

You cannot copy content of this page