कामे त्या नगरसेवकांनी पत्र दिल्यावरच सुरू करणे योग्य होईल – विजय वहाडणे
It will be appropriate to start the work only after the corporator gives the letter – Vijay Wahadne
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3April 2021, 16:00 :00
कोपरगांव : कार्यादेश देऊन प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर कोल्हे गटाने कामे मधेच बंद पाडली तर जास्त नुकसान होईल. म्हणून “माझ्या प्रभागातील काम करा किंवा करू नका”असे पत्र नगरसेवकांनी दिल्यावर कामे सुरू करणे योग्य होईल असे मला वाटते असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीशनिवारी (३) रोजी नगरपालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देताना वहाडणे म्हणाले, कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत नामंजूर केलेला ११ नंबर ठराव जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका १९६५ कलम ३०८ अन्वये तहकूब केला तरीही कोल्हे गटाने नगरसेवकांच्या सह्यानिशी सदरची कामे करण्यात येऊ नयेत, होणाऱ्या आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार रहाणार नाही. आम्ही तुमच्या विरुद्ध फौजदारी दंड संहितेनुसार कारवाई करू. असा अर्ज केवळ मला श्रेय मिळू नये यासाठी केला असल्याचा आरोप वहाडणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. याबाबत त्यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना अंधारात ठेवले असेही ते.म्हणाले,
यावेळी बोलताना वहाडणे म्हणाले, त्यांनी कधीतरी घेऊन ठेवलेल्या सह्यांचा कागद या अर्जासोबत जोडलेला आहे. तेंव्हा सर्व नगरसेवकांना मी पत्र पाठवून विचारणा करणार आहे कि “तुमच्या प्रभागातील कामे करायचेत कि नाही? याचे पत्र नगरसेवकांनी दिल्यावर कामे सुरू करणे योग्य होईल असे मला वाटते. शहरातील अनेक नागरिक, राष्ट्रवादीचे नगरसेवक, अपक्ष व शिवसेनेचे दोन नगरसेवक हे सातत्याने सदरची कामे लवकर चालू करा अशी मागणी करत आहेत. त्यानुसार लवकरच कामे मार्गी लागणार आहेत.असेही वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.