कोपरगावमध्ये नगराध्यक्ष – भाजपयुतीचे जुळणार का सूर?
In Kopargaon, will the Nagaradhaksha -BJP alliance match?
दृष्टिक्षेप :
कोपरगावमध्ये नगराध्यक्षांचे सूर कुठेही जुळले तरी शहर विकासाच्या नियोजनासाठी भाजपला विश्वासात घ्यावेच लागेल,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3April 2021, 19:00 :00
कोपरगाव : येथील पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. जनतेतून निवडून आलेले अपक्ष नगराध्यक्ष आहेत. अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने पालिकेत लक्ष घातले आहे; मात्र भाजपकडे बहुमत आहे. शेवटच्या टप्प्यात विकासाच्या मुद्द्यावर भाजपयुतीचे आणि नगराध्यक्ष यांचे जुळणार का सूर ? याची सर्वांना उत्सुकता आहे.
कोपरगाव नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जेमतेम दहा महिन्यांवर आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी पालिकेची निवडणूक झाली. तेव्हा जनतेतून अपक्ष उमेदवार विजय वहाडणे नगराध्यक्ष झाले. मात्र भाजप शिवसेना युतीला २० नगरसेवकपदांची लॉटरी लागली होती. यात भाजप १४ तर शिवसेना ६ नगरसेवक होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस ला सात नगरसेवक आणि एका प्रभागातून अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली. त्यावेळी शिवसेनेचे दोन व अपक्ष एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर गेले. भाजपने शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. आणि उपनगराध्यक्ष हे महत्त्वाचे पद भाजपने आपल्याकडे ठेवले. स्थायी समिती व विषय समित्यांवर ही भाजपचेच वर्चस्व होते; बलाबलात जादा फरक होता, राज्यात सत्ता युतीची असल्याने भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारसा प्रयत्न केला गेला नाही. तरीही त्याला यश येऊ नये, म्हणून भाजपने विषय समित्यांचे सभापतिपद उपनगराध्यक्ष पद, शिवसेनेला देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली. तोच पॅटर्न कोपरगाव पालिकेत राबविण्याच्या प्रयत्न झाला पण शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी बांधीलकी जपत भाजपबरोबर राहणे पसंत केले. जनतेचा कौल मानून सत्ताधारी भाजपयुतीने नगराध्यक्षांना बडतर्फ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या नाहीत ; किंवा त्यांना कायद्याच्या कचाट्यात कुठेही पकडण्याचा प्रयत्न केला नाही. ही वस्तुस्थिती आहे व ती नाकारण्याचे काही कारण नाही. एकंदरीत चार वर्षाचा पालिकेचा कारभार पाहता ही सहिष्णुता भाजपच्या चांगलीच अंगलट आली असल्याचे दिसून येते त्यामुळे पुढे आजही भाजपला याची फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. नगराध्यक्ष यांना बडतर्फ करण्याची न खेळलेली खेळी वगळता भाजपाच्या काल परवा पर्यंत च्या सर्वसाधारण सभेतील विषय नामंजूर करण्यापर्यंतच्या सर्वच खेळी यशस्वी झाल्या आहेत . त्यामुळे भाजपकडे आता उपगराध्यक्षपद व विषय समित्या आहेत. त्यामुळे पुढील काळात विकासकामांचे नियोजन करताना नगराध्यक्षांना भाजपला विश्वासात घ्यावे लागणार आहे . आता अल्प कालावधी शिल्लक आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहरात भरीव निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. शहर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नगराध्यक्षांना शंभर टक्के सहकार्य करणार. असे पालुपद राष्ट्रवादी नगरसेवक सातत्याने वाजवत आहेत.
तर माझी बांधिलकी शहरासाठी आहे. आमदार आशुतोष काळे यांनी निधी दिल्यानंतर आम्ही त्यांचे स्वागत करू. शहर विकासासाठी निधी येणार असेल तर त्याचे स्वागत केले जाईल. – विजय वहाडणे, नगराध्यक्ष.
महाआघाडी राज्यात सत्तेवर तोच पॅटर्न कोपरगाव पालिकेत राबविणे आज तरी शक्य नाही. भाजपयुतीकडे आता उपनगराध्यक्षपद व विषय समित्या आहेत. कोपरगावमध्ये पुढील काळातविकासकामांचे नियोजन महत्वाचे असल्याने महाविकास आघाडीचा पाठिंबा असला आणि नगराध्यक्षांचे सूर कुठेही जुळले तरी सद्यस्थितीत शहर विकासाच्या नियोजनासाठी दरवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून नगरपालिका १९६५ अन्वये ३०८ खाली सर्व कामे करता येणार नाहीत व तेवढा वेळही मिळणार नाही, पत्रकार परिषद घेऊन आरोप-प्रत्यारोप करून कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही, हेही तितकेच सत्य आहे, आता “रात्र थोडी सोंगे फार” या उक्तीप्रमाणे शहर विकास साधावयाचा असेल तर नगराध्यक्षांना भाजपयुतीला विश्वासात घ्यावेच लागेल, असेे आज तरी सद्यस्थितीत आम्हाला वाटते बाकी निर्णय त्यांचा !





