आम्ही तर कर्तव्याची जाणीव करून दिली; पण त्यांनी तर निष्क्रियता झाकण्यासाठीच राजकिय रंग दिला – सौ. वैशाली साळुंके
We were made aware of our duty; But he gave political color only to cover inactivity – Mrs. Vaishali Salunke
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 4April 2021, 16:00 :00
कोपरगाव : आम्ही तर कोरोनात बघ्याची भुमिका घेणा-या लोकप्रतिनिधींना कर्तव्याची जाणीव करून दिली, पण त्यांनी तर आपल्या नेत्याची निष्क्रियता झाकण्यासाठीच त्याला राजकिय रंग दिला असल्याची टीका भारतीय जनता पार्टी महिला तालुकाध्यक्ष सौ. वैशाली विजय साळुंके यांनी केली.त्याऐवजी नेत्याला उपाययोजना करण्याचा सल्ला द्या असे ही त्या म्हणाल्या,
सौ साळुंके म्हणाल्या, कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा, तोकडी पडणारी यंत्रणा, कोरोना चाचण्यात येणा-या अडचणी, अहवालासाठी होणारा विलंब, विलगीकरणासाठी नसलेली व्यवस्था, कोरोनाबाधितांना ऍडमिट करून घेतांना यंत्रणेची होणारी धावपळ, त्यातुन हतबल झालेले आरोग्यसेवेतील कर्मचारी खाजगी दवाखान्यात उपचार घेऊ शकत नसल्याने रूग्णांची होणारी हेळसांड त्यातून होणारे मानसिक खच्चीकरण यामुळे तालुक्यातील मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.अशा वेळी मिटींगा आणि बैठका घेण्याचा फार्स करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी मध्यंतरीच्या काळात उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले असते तर ही परिस्थिती तालुक्यावर निश्चितच ओढावली नसती. हे सर्व हाताळण्यास लोकप्रतिनिधी कमी पडले, त्यांच्या निष्क्रियतेमुळेच आज याप्रसंगाला जनता सामोरी जात आहे. ही परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याने आपल्या नेत्याची निष्क्रियता झाकण्यासाठीच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सौ. साळुंके यांनी म्हटले आहे.