कोपरगावात ३२ पैकी २० कोरोना अहवाल निगेटिव्ह, तर १२ अहवाल प्रतिक्षेत ;
कोपरगाव :
जिल्हा शासकीय रुग्णालय नगर येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या ४९ अहवालांपैकी ३७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी सर्व ३७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून आता केवळ १२ अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष विधाटे यांनी रात्री उशिरा दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर म्हणाले, डॉक्टर व मुंबईचा पाहुणा या दोघांच्या संपर्कात आजपर्यंत आलेल्या ४९ संशयीत रूग्णाच्या साखळीत शनिवारी (४ जुलै) २१ जणांचे रविवारी (५ जुलै) १९ जणांचे तर सोमवारी (६ जुलै) ९ जणांचे अहवाल असे ४९ जणांचे तपासासाठी जिल्हा रुग्णालय नगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापैकी सोमवारी (६जुलै) रोजी रात्री उशिरापर्यंत ३७ अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. उर्वरित १२ अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशा १४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यात दोन जणांवर नगर येथे तर उर्वरित सहा जणांवर कोपरगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव कोविड सेंटरमधील ३२ रूग्णावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे लक्ष ठेवून आहेत.