पाटबंधारेला इशारा :शेतक-यांचा अंत पाहु नका ; आवर्तनाच्या तारखा जाहीर करा- सौ. स्नेहलता कोल्हे

पाटबंधारेला इशारा :शेतक-यांचा अंत पाहु नका ; आवर्तनाच्या तारखा जाहीर करा- सौ. स्नेहलता कोल्हे

Irrigation warning: Don’t see the end of farmers; Announce the dates of rotation- Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 5April 2021, 17:00 :00

कोपरगाव : रब्बी हंगामात पिकांसाठी
उन्हाळी आवर्तनच्या १५ मार्च, १५ एप्रिल, १५ मे अशा तारखा जाहिर न केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतक-यांचा अंत पाहु नका, आवर्तनाच्या तारखा जाहीर करा,आता शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव , माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.

कोपरगाव धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने उन्हाळ्यात तीन आवर्तन मिळतीलच या अपेक्षेने शेतक-यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. विहीरींची पाण्याची पातळी खुपच कमी झाली, उष्णतेचे पिकांचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. पाणी मागणी वाढलेली आहे.मार्चमध्येच उन्हाळी पहिले आवर्तन मिळालेच पाहिजे होते. पाणीवाटप बाबत पाटबंधारें विभागाचे धोरण नेमके आहे तरी काय ? यावर शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. आता एप्रिल ला आवर्तन सुरू होईल तोपर्यंत शेतक-यांची पीके हाताबाहेर गेलेली दिसतील मग धरणातील पाण्याचे काय करणार काय? त्यात वाढ होणार आहे का ? अशी विचारणा करुन सौ. कोल्हे

सौ. कोल्हे पुढे म्हणाले की, कोरोनामुळे सर्व अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि शेतक-यांची पण हीच परिस्थिती आहे. त्याच्या मालाला भाव नाही, खर्च सुद्धा निघालेला नसतो त्यात वादळीवारा, गारपीट, अतिवृष्टीमुळे अशा वेगवेगळ्या संकटकाळी शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हा निघुन गेला. नैसर्गिक आपत्तीनंतर महावितरण निर्मीत आपत्तीमुळे आजही जगाचा पोशींदा असलेला शेतक-याने जगायचे तरी कसे ?. पाटबंधारे विभागाने शेतक-यांचा अंत पाहु नका उन्हाळी आवर्तनाच्या तारखा त्वरीत जाहिर करा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची पाटबंधारे खात्याने गंभीरपणे दखल घ्यावी इशारा भाजपाच्या वतीने सौ.कोल्हे यांनी दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page