पोहेगाव पतसंस्थेच्या ठेवी ११५ कोटी ५८ लाख, तब्बल २४.३२ कोटींची वाढ        

पोहेगाव पतसंस्थेच्या ठेवी ११५ कोटी ५८ लाख, तब्बल २४.३२ कोटींची वाढ

 Deposits of Pohegaon Credit Union increased by 115 crore 58 lakhs, a whopping 24.32 crores

 कोपरगाव : पोहगाव नागरी पतसंस्थेच्या ठेवीमध्ये तब्बल २४ कोटी ३२ लाख रूपयाची वाढ होऊन  ठेवी ११५ कोटी ५८ लाख एवढया झाल्या आहेत .  तसेच कर्ज वाटपामध्ये १७ कोटी ६५ लाख रूपयाची वाढ होऊन ७८कोटी १८ लाख एवढे झाले असुन संस्थेची एकुण गुंतवणक ४८ कोटी ६५ लाख एवढी आहे. संस्थेला ३१ मार्च २०२१ अखेर १ कोटी ३९ लाख रूपये इतका निव्वळ  नफा झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक नितीन औताडे यांनी दिली.

    या बाबत बोलताना संस्थेचे चेअरमन म्हणाले कि, गत आर्थिक वर्ष संपत असतानाच लॉकडाऊन जाहीर झाला, तसेच गत वर्षभर कोरोनामुळे  सर्वांच्याच  व्यवहारांवर परिणाम झाला असताना देखील संस्थेने ठेव वाढ,कर्ज वाढ व गुंंतवणुक यामध्ये नेत्र  दिपक वाढ केलेली आहे. विशेषत: कर्ज वाटपापैकी सोनेतारण कर्ज हे सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे. संस्थेचे सोनेतारण कर्ज दि.३१ मार्च २०२० अखेर फक्त  २ कोटी ६७ लाख इतकेच होते ते ३१ मार्च २०२१ अखेर ७ कोटी १३ लाख रूपये झालेले आहे. सोनेतारणावर जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याबरोबरच  ग्राहकांना त्वरीत सेवा देण्याचे काम संस्थेचे कर्मचारी करीत असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री.दादासाहेब औताडे यांनी सांगितले.         तसेच संस्थेची सुरक्षित गुंतवणुक ४८ कोटी ६५ लाख रूपये असुन कर्ज वाटप ७८कोटी १८ लाख रूपये आहे.  एकुण कर्ज गुंतवणक प्रमाण ६७.६३ इतके असल्याची माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन विलास रत्ने यांनी दिली.         संस्थेने आय.सी.आय.सी.आय बँकेबरोबर व्यवहार करत स्वत:चा IFSC  कोड घेऊन NEFT /RTGS सुविधा दिल्यामुळे   ग्राहकांना थेट आपल्या खात्यामध्ये व्यवहार करणे सुरक्षित झालेले असल्याचे संस्थेचे सर व्यवस्थापक  सुभाषराव  औताडे यांनी सांगितले.         संस्थेच्या कर्ज वसुली कर्मचारी  यांनी कोरोना व लॉक डाऊनचे काळात अतिशय शांत व संयमी पध्दतीने कर्ज वसुली करत थकबाकीचे प्रमाण अवघे ३ टक्के ठेवण्यात यश मिळवीले आहे.  संस्थेच्या यशामध्ये संस्थेचे सर व्यवस्थापक सुभाषराव   औताडे, कर्ज विभागाचे जनरल मॅनेजर  विठ्ठल घारे चेअरमन ,व्हा.चेअरमन, संचालक,कर्मचारी, प्रतिनिधी हितचिंतक यांचा वाटा आहे असे संस्थेचे संचालक व स्थैर्यनिधीचे संचालक रमेश  रामचंद्र झांबरे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page