कोपरगाव रेणुकानगर बांधकाम मजुरांच्या आपसातील वादात एका मजुराचा खून
मयत व दोन्ही आरोपी पश्चिम बंगालचे
कोपरगाव :
रेणुकानगर ख्रिश्चन मिशनरीच्या
डि पॉल शाळेच्या बांधकामावर सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आपापसातील वादावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्या व लाकडी दांडक्याने मारून जखमी जखमी करून दोघांनी रखवालदाराचा खून केला. सोनू निमाई बिश्वास ( २५, सुरूलिया, मंगलकोट ,बर्धमान पश्चिम बंगाल) असे मृत मजुराचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राहुल राजव्यापारी मोंडल, रा. माजेग्राम, राणाघाट नदिया, पश्चिम बंगाल, सुकल मंगला हेमब्राम रा. छोरा कॉलनी, छोरा हटला, छोरा बर्धमान, पश्चिम बंगाल या दोन मजुराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रेणुकानगर ख्रिश्चन मिशनरीच्या
डि पॉल शाळेच्या बांधकामावर सोमवारी (६जुलै) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आपापसातील वादावरून चिडलेल्या दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपी सुकल मंगला हेमब्राम जाने हातातील लाकडी दांड्याने मारहाण करून डोक्यास गंभीर जखम करून जीवे ठार मारले दिगंबर ज्ञानदेव होगे (५२) राहणार भारत गॅस कंपनी जवळ, शिंदे शिंगी नगर या मजुराच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे . कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे स्वतः या गुन्ह्याचा तपास करीतआहेत.