‘ब्रेक द चेन’
कोपरगाव बाजारपेठेत आज तिसऱ्या दिवशीही शुकशुकाट; तर मेडिकल व दवाखाने इथे मात्र गजबजाट!
Break the chain ‘
Kopargaon market is dry for the third day today; Medical and dispensaries are very busy here!
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 8April 2021, 19:00 :00
कोपरगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत जीवनावश्यक वस्तू वगळता, उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील दुकाने बंद असल्याने मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. कोपरगावात वर्दळीने गजबजलेले रस्ते, चौक ओस पडले होते. अनेक भागांत मेडिकल व दवाखाने इथे मात्र गजबजाट सुरू असल्याचे दिसून येत होते.
जीवनावश्यक वस्तू वगळता, संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आल्याने कोपरगाव शहरात मंगळवार पासून मोठा परिणाम पाहायला मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी गुरूवारी ही बहुतांश ठिकाणी बंद असताना रस्त्यावर लोकांची गर्दी मात्र कायम होती. कोपरगाव व्यापारी महासंघाने बैठक घेतली असून काही व्यापाऱ्यांनी व्यापार करण्यास परवानगी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे, तर काही संघटनां यांनीही अशी मागणी केली आहे. कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी सुरू केल्याने नेहमी वर्दळीने गजबजणारे रस्ते, चौक आणि गल्ल्या ओस पडल्या होत्या. बहुतांश सर्वच शासकीय कार्यालयांत अभ्यंगतांना प्रवेश बंद करण्यात आला होता. दरम्यान, सरसकट दुकाने, व्यवसाय बंदला विरोध करण्यात येत आहे. तरी मंगळवारी, बुधवारी व गुरूवारी तिसऱ्या दिवशीही मात्र सगळ्यांनी कडकडीत बंद पाळला. मात्र भाजीपाला व किराणा दुकाना पेक्षाही ठिकठिकाणच्या मेडिकल आणि दवाखाने याठिकाणी मात्र रांगा लागलेल्या दिसत होत्या,