दारू आणून देणार नाही म्हटल्यामुळे डोक्यात कु-हाड मारली
He said he would not bring alcohol and hit her in the head
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 8April 2021, 21:00 :00
कोपरगाव : तालुक्यातील पढेगाव भिलाटी येथे काल गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दारू आणून देणार नाही म्हटल्यामुळे डोक्यात कु-हाड मारली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रदीप कैलास कदम हा भिलाटी पडेगाव तालुका कोपरगाव येथे बसलेला असताना यातील आरोपी विठ्ठल अण्णासाहेब शिंदे हा त्यास म्हणाला की मला दारू आणून दे त्यावेळी फिर्यादी म्हणाला की मी दारू आणून देणार नाही याचा राग आल्याने यातील आरोपी मजकूर यांनी त्याच्या हातातील कुऱ्हाड फिर्यादीचे डोक्यात मारून जखमी केले व दुखापत करून शिवीगाळ दमदाटी केली, वगैरे फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका.२१२४ ए. आर. वाखुरे पुढील तपास करीत आहे