“ब्रेक द चैन”: हॉटेल रसराज व हॉटेल रसरंग सात दिवसांसाठी सील – प्रशांत सरोदे

“ब्रेक द चैन”: हॉटेल रसराज व हॉटेल रसरंग सात दिवसांसाठी सील – प्रशांत सरोदे

“Break the Chain”: Hotel Rasraj and Hotel Rasrang Seal for seven days – Prashant Sarode

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9April 2021, 19:00 :00

कोपरगाव : हॉटेल अस्थापणा यांना फक्त पार्सल सुविधा देणेबाबत निर्बंध असताना सावरकर चौक येथील हॉटेल रसराज व गुरुद्वारा रोड येथील हॉटेल रसरंग या दोन्ही हॉटेल यांनी नियमांचे उल्लंघन करतांना कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे पथकाला आढळून आल्याने कारवाई करून सदर दोन्ही हॉटेल सात दिवसासाठी सील / बंद करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली .

कोरोना संसर्गाची दुसरीलाट अतितीव्र स्वरुपात असल्याने “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत मा.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ यादरम्यान जमावबंदी लागु राहील. ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू शकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. शहरातील वैद्यकीयसेवेसह अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवणे बाबत आदेशित केले आहे.तर रात्री ८ ते सकाळी ७ यादरम्यान संचारबंदी असेल यावेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये. आज दिनांक ०९ एप्रिल २०२१ रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विविध भरारी पथके करून शहरातील मार्केट भाग, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बँक रोड, मंगलकार्यालय विविध भागात धडक मोहिमी राबवली. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सुरु असलेल्या सेवा, छोटे व्यवसायिक व नागरिक यांना समुपदेशना / चर्चे द्वारे इतर अस्थापना बंद करून सहकार्य करावे असे आवाहन केले. “ब्रेक द चैन” यामोहिमेअंतर्गत नागरिक व्यापारी यांचे त्यांच्याशी संवाद साधून जाणीव जागृती निर्माण करून कोरोना प्रादुर्भाव रोखणे कामे सर्वांनी सहकार्य करावे या करिता शासन व प्रशासन विविध उपाय योजना राबवत असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासना मार्फत करण्यात येत आहे. .

Leave a Reply

You cannot copy content of this page