धामोरीत ४४ वर्षीय ग्रामपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या,

धामोरीत ४४ वर्षीय ग्रामपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या,

तालुका ग्रामीण पोलिसांत आकस्मातची नोंद

ग्रामपंचायत शिपायाने जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या सार्वजनिक वाचनालयाच्या खोलीत दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी धामोरी येथे घडली. या शिपायाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.

 

कोपरगाव
धामोरी ग्रामपंचायत शिपाई कम वाॅलमन याने जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या सार्वजनिक वाचनालयाच्या खोलीत दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (७ जुलै) रोजी सकाळी धामोरी येथे घडली. या शिपाई कम वाॅलमन याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.

मोहन आबाजी वाणी वय (४४) राहणार धामोरी असे या आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत मध्ये मोहन वाणी हा शिपाई कम वाॅलमनचे काम करतो . मोहन मंगळवारी (७ जुलै) रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी वाॅलमन म्हणून पाणी सोडण्यासाठी कार्यालयात आला होता. काम झाल्यानंतर त्याने सार्वजनिक वाचनालयाच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत मोहन वाणी यांच्या घराचे बांधकाम काम सुरू असल्याने जुन्या ग्रामपंचायती शेजारी असलेल्या सभागृहात ते आपल्या कुटुंबासह गेल्या तीन-चार महिन्यांपासून राहत होते. मयत मोहन वाणी यांना पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी पोलिसांनी पोलिस पाटील संगिता विजय ताजणे यांच्यासमोर पंचनामा केला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मयताला खाली घेत तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून तो मृत घोषित केले. कोपरगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

मोहन वाणी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी मयताचा मुलगा भागवत मोहन वाणी (२४) यांनी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिसात खबर दिली असून, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ. सी. एम. तोर्वेकर करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page