खाजगी डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीतून कोरोना रुग्णांवर उपचार करावे. – आ.काळेंची भावनिक साद
Private doctors should treat corona patients with a service-oriented attitude. – Aa. Kale’s emotional call
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11April 2021, 17:35 :00
कोपरगाव : कोरोनामुळे झालेले मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे.आपण सर्वांनी सेवाभावी वृत्तीतून या रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावे. अशी भावनिक साद आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांना रविवारी (दि.११) रोजी साईबाबा तपोभूमी येथील बैठकीत घातली. त्यांनी घातलेल्या भावनिक साद नंतर वातावरण काहीसे निशब्द झाले होते.
आ. काळे म्हणाले की, अचानकपणे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्यसेवेवरील ताण प्रचंड वाढला आहे. रुग्णांसाठी डॉक्टर हेच एकमेव आशेचा किरण आहे. अशा परिस्थितीत सरकारी व खाजगी डॉक्टर पुढे आलेत हि अतिशय समाधानाची बाब आहे. जीवाची पर्वा न करता आपण डॉक्टरांच्या रुपात देव उपचार करीत आहे. आरोग्य विभाग व प्रशासन आपल्या परीने योग्यप्रकारे त्यांचे कर्तव्य बजावत आहे. त्याजोडीला खाजगी डॉक्टर यांची साथ मोलाची ठरत आहे.आरोग्य विभागाच्या मागणीनुसार आवश्यक त्या सोयी सुविधा देखील वेळेत उपलब्ध करून दिल्या जात आहे. खाजगी डॉक्टरांना येत असलेल्या ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीव्हर इंजेक्शन तुटवडा या अडचणी सोडविण्याची ग्वाही आ. काळे यांनी दिली आहे.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. दत्तात्रय मुळे, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. योगेश कोठारी, डॉ. राजेश माळी, डॉ. मयूर तिरमखे, डॉ. संकेत माळी, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे सेक्रेटरी प्रसाद कातकडे, आदी उपस्थित होते.





