केंद्रीय आरोग्य पथकाकडून कोपरगावच्या कोविड सेंटरची पाहणी

केंद्रीय आरोग्य पथकाकडून कोपरगावच्या कोविड सेंटरची पाहणी

Inspection of Kovid Center in Kopargaon by Central Health Squad

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11April 2021, 18:00 :00

कोपरगाव : नगर जिल्ह्यात सध्या वाढत असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय पथकाला आढळून आले. या पथकाने कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. काॅलेज,ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय कोपरगाव),येथे भेट देवून आढावा घेतला.

तसेच लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेवून संस्थानिक विलिनीकरण,रुग्णाचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी, प्रतिबंधित क्षेत्र या सह कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कोपरगाव तालुक्यातील उपाययोजना संदर्भात माहिती केंद्रीय पथकातील डॉ.एन. गिरीश राव आणि डॉ.सुशील गुरीया या दोन सदस्यांनी जाणून घेतली. डॉ.एन.गिरीश राव हे बंगलुरु येथील एन. आय. एन. एम. ए.संस्थेत शास्त्रज्ञ आहेत.तर डॉ.सुशील गुरीया हे दिल्ली येथील एस जे एस संस्थेत वरिष्ठ तज्ञ म्हणून कार्यरत आहे. या प्रसंगी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. संजीव बेळंबे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ.दादासाहेब साळुंके,साथ रोग शास्त्रज्ञ डॉ.करण नागपुरकर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे हे त्यांचे समवेत होते. या प्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड), ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ.गायत्री कांडेकर, सुशांत घोडके, सचिन जोशी, सुनील गोर्डे, यांचे सह आरोग्य विभाग , नगरपरिषद , पंचायत समिती कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष कामकाज करणार्या कर्मचारी यांचे कामकाजाची प्रशंसा करुन बी.बी.जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page