कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे हि लढाई एकत्रित येऊन लढावयाची आहे – ना. बाळासाहेब थोरात

कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे हि लढाई एकत्रित येऊन लढावयाची आहे – ना. बाळासाहेब थोरात

The second wave of Corona is very serious. This battle is to be fought together – no. Balasaheb Thorat

कोपरगाव : कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेवून लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासनाने एकत्र येवून हि लढाई लढावयाची आहे असे आवाहन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात रविवारी (दि.११) रोजी कोपरगाव येथील आढावा बैठकीत केले. कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून कोरोनावर नियंत्रण मिळवा असे ही ते म्हणाले,

रेमडीसीव्हर इंजक्शनचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घेवून ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व कोविड केअर सेंटरला रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा करावा. वाढत असलेल्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी खाजगी तपासणी केंद्रांना तपासणी कीट उपलब्ध करून द्यावे त्याचे नियंत्रण ग्रामीण रुग्णालयाकडे ठेवून प्रत्येक ग्रामीण रुग्णालयास तपासणी कीट देवून तपासणी कीट संख्या वाढवून मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
कोपरगाव नगरपालिकेकडून देण्यात आलेली करोना रुग्णांची आकडेवारी व माहिती त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालया कडील कोरोना  रुग्णांची आकडेवारी व माहिती यात तफावत दिसल्यामुळे ना. बाळासाहेब थोरात यांनी पालिका अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे कळते .

यावेळी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या समवेत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, खा. सदाशिव लोखंडे साहेब, आ. सुधीर तांबे, मा.आ. सौ. स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पोलीस उपअधीक्षक. संजय सातव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा कोपरगाव दौऱ्याबाबत कोपरगाव नगरपालिकेने पत्रकारांना फोन केले नाही व माहिती दिली नाही त्यामुळे पत्रकार उपस्थित नव्हते. कोपरगाव शहरामध्ये दिवसागणिक वाढणारे कोरोना रुग्ण शहरात सुरू असलेला लॉक डाऊन या पार्श्वभूमीवर मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणारी कोरोना आढावा बैठक अतिशय महत्त्वाची होती. मंत्री, खासदार, आमदार,माजी आमदार, जिल्हाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी गावातील सन्माननीय नागरिक उपस्थित राहणार असल्याने या आढावा बैठकीस प्रिंंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना  का बोलावले नाही ? का टाळण्यात आले ? याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी एकमेकांची नावे सांगून चालढकल केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page